कालपासून सुरु झालेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये भारताची बॅडमिंटनपटू जोडी अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी महिला दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाले आहेत.
५६ मिनिटे चालू असलेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी यांनी जोरदार लढत दिली परंतु चायनाच्या डोंगपिंग हुआंग-वेंमेई ली यांनी भारतीय बॅडमिंटनपटूंना २१-११ अश्या फरकाने हरवले.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्हीही संघामध्ये जोरदार लढत चालू होती. चायनाच्या डोंगपिंग हुआंग-वेंमेई ली यांच्यावर भारतीय बॅडमिंटनपटूंनी आक्रमण करीत दुसरा सेट २१-१९ अश्या फरकाने जिंकला.
२१ मिनिट चालू असलेल्या तिसऱ्या सेटमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु चायनाच्या खेळाडूंनी २१-१९ अश्या फरकाने हा सेट जिंकत सामनाही जिंकला.