Shubman Gill Double Century: भारतीय क्रिकेटला शुबमन गिलच्या रूपात एक नवा ‘सुपरस्टार’ मिळाला आहे. गिलने भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनताच रेकाॅर्ड्सचा पाऊस पाडायला सुरूवात केली आहे. त्याने मालिकेच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते आणि आता दुसऱ्या कसोटीत द्विशतक ठोकले आहे. (Shubman Gill Double Century) खरं तर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी गिलचा कसोटीतील रेकाॅर्ड एवढाही खास नव्हता, परंतु तो एक महान खेळाडू बनेल अशी भविष्यवाणी 1 वर्षापूर्वीच झाली होती. (Kevin Pietersen Shubman Gill Prediction)
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसनने आपल्या एका जुन्या ट्वीटचा फोटो शेअर केला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये केलेल्या या पोस्टमध्ये पीटरसनने दावा केला होता की, गिलला थोडा वेळ दिला तर तो एक महान खेळाडू म्हणून उदयास येईल. पीटरसनने आपल्या जुन्या ट्वीटमध्ये लिहिले होते, “पहिल्या १10 कसोटी सामन्यांमध्ये जॅक कॅलिसची सरासरी फक्त 22 होती, पण पुढे चालून तो क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक बनला. शुबमन गिलची महानता शोधण्यासाठी त्याला थोडा वेळ द्या.” (Kevin Pietersen Shubman Gill Prediction)
Remember my tweet about @ShubmanGill ? pic.twitter.com/7cGKPNxrZ4
— Kevin Pietersen???? (@KP24) July 3, 2025
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी शुबमन गिलने 32 कसोटी सामन्यांच्या 59 डावांमध्ये 1,893 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याची सरासरी 35.06 होती. आता इंग्लंडविरुद्ध त्याने 3 डावांमध्ये 424 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या 3 डावांमध्ये त्याने 1 शतक आणि 1 द्विशतक झळकावले आहे. परिणामी, आता फक्त 3 डावांनंतर त्याची कसोटी सरासरी वाढून 40.64 झाली आहे. (Shubman Gill Test Records)
गिलने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 269 धावांची खेळी करून अनेक रेकाॅर्ड मोडीत काढले. इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. (Shubman Gill highest score in England) त्याने दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करच्या 221 धावांचा रेकाॅर्ड मोडला आहे. (Sunil Gavaskar record broken by Gill) गिलची एजबॅस्टनच्या मैदानावरील खेळी नेहमीच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय ठरेल. आता आगामी डावात तो आपला फाॅर्म कायम राखण्यात यशस्वी राहतो की नाही? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.






