आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. दरम्यान भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव आपले सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ घोषित देखील झाला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसेल. पण चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) फिटनेसबद्दल मोठे अपडेट समोर आले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 2-3 दिवस एनसीए (NCA) तज्ञांच्या निरीक्षणाखाली असेल. संपूर्ण चौकशीनंतरच हा अहवाल अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडे पाठवला जाईल. भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी, एक अपडेट समोर आले होते की बुमराहचा भारतीय संघात समावेश केला जाईल, परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.
गेल्या महिन्यात पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी सांगितले की, जसप्रीत बुमराहला 5 आठवडे विश्रांती देण्यात आली आहे आणि तो इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या 2 वनडे सामन्यात खेळणार नाही. बुमराहच्या तंदुरुस्तीचा निर्णय फेब्रुवारीच्या सुरुवातीला घेतला जाईल. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल तपासल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघात जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) कायम ठेवायचे की नाही? हे ठरवण्यासाठी भारतीय संघाकडे फक्त एक आठवडा शिल्लक आहे. (11 फेब्रुवारी) पर्यंत, सर्व 8 संघांना कोणत्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कोणत्याला नाही? हे ठरवायचे आहे. दरम्यान, बुमराहला इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खेळून त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा
आता भारत-इंग्लंड (India vs England) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (6 फेब्रुवारी) पासून होणार आहे. नुकतीच भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 4-1 असा शानदार विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ स्टार फिरकीपटूला मिळाला ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार
ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धेत आरएफवायसी, ब्रदर्स स्पोर्टस असोसिएशन संघाची विजयी सलामी
हे चार संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचतील, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंंदाज