आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील संघांबद्दल एक भाकित केले आहे. गांगुली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे सांगितली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माजी भारतीय कर्णधाराने पाकिस्तानला यामध्ये निवडले नाही. कारण यंदाचे चॅम्पियन्स ट्राॅफीचे आयोजन पाकिस्तान करत आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना गांगुलीने या चार संघांची नावे सांगितली आहेत. माजी भारतीय कर्णधाराने भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांबद्दल भाकीत केले आहे. गांगुलाने या संघांना अंतिम चार मध्ये निवडले आहे. तो म्हणाला की हे चारही संघ जेतेपदासाठी दावेदार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाकडून काय अपेक्षा आहेत यावर गांगुलीने आपले मत मांडले आणि तो म्हणाले, “भारताने टी20 विश्वचषक जिंकला आहे. तर भारत 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. मला वाटते की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारत पात्र संघापैका एक आहे. भारताचा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये इतिहास खूप चांगला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताने दोनदा विजेतेपद जिंकले आहे. 2002 आणि 2013 मध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. मात्र, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर, 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा महान सामना खेळला जाईल. यानंतर भारतीय संघ 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळेल. तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा-
‘आम्हाला निर्भय क्रिकेट….’, सामन्यानंतर हेड कोच गाैतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया
भारत तर सोडा इंग्लंड संघ एकट्या अभिषेक शर्माकडून हरला, पाहा आकडेवारी
IND vs ENG: वानखेडेवर विक्रमांची मालिका, टीम इंडियाचा इंग्लंडला दे धक्का…..






