---Advertisement---

ऑरेंज कॅप शर्यतीत नव्या खेळाडूची एन्ट्री, गुजरातविरुद्ध शतक झळकावून कोहलीला टाकलं मागे!

On: शुक्रवार, मे 23, 2025 5:57 PM
---Advertisement---

आयपीएल स्पर्धेचा (IPL Season 18) 18 वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या हंगामातील प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारे संघ सुद्धा मिळाले आहेत. तसेच यावेळेस आयपीएल पॉईंट्स टेबल सोबत ऑरेंज कॅपसाठी (Orange cap) धावांची रेस सुद्धा खूप मजेशीर चाललेली दिसत आहे. या हंगामात ऑरेंज कॅपचे खूप मोठे-मोठे दावेदार समोर आले आहेत. आता या रेसमध्ये अजून एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा फलंदाज मिचेल मार्श (mitchell marsh) या रेसमध्ये सामील झाला आहे. तो या रेसमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. गुरुवार 22 मे रोजी गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सामन्यात त्याने शतकी पारी खेळली. या दरम्यान त्याने 64 चेंडूत 117 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे संघाने 200 च्या पुढे धावसंख्या उभारली आणि लखनऊने गुजरात विरुद्ध विजय मिळवला. मिचेल मार्शने या हंगामात 12 सामन्यांमध्ये 560 धावा केल्या आहेत आणि सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली (virat kohli) काही दिवसांपासून ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये टिकून होता आणि टॉप वर सुद्धा पोहोचला होता. या हंगामात विराटने 11 सामन्यांमध्ये 505 धावा केल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर, मिचेल मार्शचा हंगामातील फक्त एक सामना उरला आहे. तसेच विराट कोहलीला प्लेऑफचे सामने सुद्धा खेळायचे आहेत. त्यामुळे पुढे जाऊन विराट या यादीमध्ये सामील होऊ शकतो.

ऑरेंज कॅपच्या यादीत गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन (sai sudarshan) टॉप वर आहे. त्याने 13 सामन्यात 638 धावा केल्या आहेत. तसेच या यादीत गुजरातचा कर्णधार दुसऱ्या स्थानावर आहे.त्याने 13 सामन्यांमध्ये 636 धावा केल्या आहेत. सुदर्शन आणि गिलच्या धावांमध्ये फक्त दोन धावांचं अंतर आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा(mumbai indians) फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 583 धावा केल्या आहेत. तसेच 12 सामन्यांमध्ये 560 धावा करून मिचेल मार्श चौथ्या स्थानावर आहे. याचबरोबर यशस्वी जयस्वाल (yashasvi jaiswal) 14 सामन्यांमध्ये 559 धावा करून पाचव्या स्थानावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---