---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील भारतीय खेळाडूंच्या हॉटेलजवळील मैदानावर विमान कोसळले

On: शनिवार, नोव्हेंबर 14, 2020 10:46 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे विमान अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय संघाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत, त्या हॉटेलपासून अवघ्या काही अंतरावर हा मोठा अपघात झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. सध्या खेळाडू सिडनी येथे आहेत. तर, आज (१४ नोव्हेंबर) रोजी सिडनीतील ज्या हॉटेलमध्ये खेळाडू उतरले आहेत तिथून ३० किमी. अंतरावर असलेल्या एका मैदानात विमान कोसळले आहेत. भारतीय संघाचे सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचेही समजत आहे.

ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली त्या मैदानात खेळाडू खेळत होते. त्यांना विमान कोसळत आहे, आणि ते मैदानाच्या दिशेने येत असल्याता अंदाज आला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना ओरडून इशारा दिला. त्यानंतर खेळाडू मैदानाबाहेर सुरक्षित अंतरावर गेले. त्यामुळे या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया संघासोबत २७ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या वनडे, टी२० आणि कसोटी मालिकांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---