प्रीमीयर लीगची सुरुवातच असताना लीग विजेतेपदासाठी मॅंचेस्टर सिटी आणि मँचेस्टर यूनाइटेडने आपली दावेदारी मजबूत केली आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यापासून बरोबर गुण घेऊन नंबर १ च्या जागेसाठी लढत आहेत, फरक आहे तो केवळ गोल संख्यांचा.
मँचेस्टेर सिटी पहिल्या स्थानवर आहे त्यांनी २२ गोल केले आहेत तर २ गोल त्यांच्यावर झाले आहेत. मँचेस्टेर यूनाइटेड ने २१ गोल केले तर २ गोल त्यांच्यावर झाले आहेत. सिटीचा गोल फरक २० आणि यूनाइटेड चा १९ असल्यामुळे ते अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.
मँचेस्टेर सिटीचा स्ट्राइकर ऑग्वारोच्या दुखापती नंतर सिटीला चेल्सी सोबत जिंकणं अवघड होणार असं वाटत असताना स्टार मिडफ़ील्डर डि ब्रूयनेच्या गोलने त्यांना १-० असा विजय मिळवून दिला तर यूनाइटेडने क्रिस्टल पैलेसचा ४-० असा धुव्वा उडवला.
दोन्ही संघांची ताकद ही त्यांची मजबूत मिडफिल्ड आणि ताकदवर अटॅक आहे. गुणतालिका पाहून तरी असं दिसतय की प्रीमीयर लीगचा निर्णय मँचेस्टेर डर्बीनेच होईल. गतवर्षिचे विजेते चेल्सी ७ सामन्यात १३ गुण घेऊन ४ नंबर ला आहेत.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)