क्रिकेटचे चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या खेळाडूंसाठी मर्यादा ओलांडतात. आता बिहारचा रहिवासी असलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका मोठ्या चाहत्याचं प्रकरण समोर आलं आहे. वास्तविक, एका शाळकरी मुलाची मार्कशीट सोशम मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यानं त्याचं नाव ‘विराट कोहली’ असे लिहलं आहे आणि त्यानं त्याच्या आईचं नाव विराटच्या आईसारखंच लिहलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मार्कशीटमध्ये विराटच्या चाहत्यानं त्याचं नाव विराट कोहली, आईचं नाव सरोज कोहली, वडिलांचं नाव प्रेमनाथ कोहली आणि शाळेचा कोड ’18 RCB’ असा लिहिला आहे. 18 हा विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आहे. कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळत असल्यानं, चाहत्यानं परीक्षेत आपल्या वर्गाचं नाव ‘RCB’ असं लिहिलं आहे. रोल नंबर 18 आहे आणि शिफ्ट ऐवजी ओपनिंग लिहिलं आहे कारण कोहली आरसीबीसाठी ओपन करतो.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) August 10, 2024
याशिवाय प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उत्तरपत्रिकेत 4 पर्याय दिले आहेत. जबरदस्त सर्जनशीलता दाखवणाऱ्या या चाहत्यानं गोल अशा प्रकारे भरले आहेत की एकत्र केल्यावर ’18 RCB’ तयार होते. या मार्कशीटवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अशा प्रकारची वागणूक बघून काही लोकांनी या मुलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) बोलायचं झालं, तर विराटचे जगभरात अनेक चाहते आहेत. काही चाहते त्याला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडून काही गोष्टी करताना दिसतात. कोहली चाहत्यांसाठी एका सेलिब्रेटी सारखा असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. क्रिकेटच्या मैदानावर कोहली फलंदाजी तसंच क्षेत्ररक्षण करताना तो चाहत्यांचं नेहमीच मनोरंजन करताना दिसतो. चाहते कोहलीचे दिवाणे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत विराट कोहली फ्लॉप का ठरला? माजी सहकाऱ्याने सांगितले मोठे कारण
सुरेश रैना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘या’ टी20 लीगमध्ये मिळाली खास जबाबदारी
‘पंजाब, तुम्ही यासाठी तयार आहात का?’ म्हणत विराट कोहलीची चाहत्यांसाठी मोठी घोषणा