भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनसाठी खास ठरला आहे. या सामन्यात अश्विनने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना अश्विनसाठी खूप खास ठरला. हा टी-२० सामना त्याच्या कारकिर्दीतील ५० वा सामना ठरला आहे. या सामन्यात २ शानदार विकेट्स घेत त्याने आपल्या या सामन्याला अजून खास बनवले. त्याने न्यूझीलंडच्या अर्धशतकवीर मार्क चॅपमनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याच षटकात त्याने ग्लेन फिलिप्सला शून्यावर पायचित केले होते.
अश्विनने त्याच्या एकूण आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ६० विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ६.८६ इतका राहिला आहे. भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. त्याने ६६ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी युझवेन्द्र चहल आहे. चहलने ६३ विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय अश्विनने १११ एकदिवसीय सामन्यात १५० विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ४.९१ इतका राहिला आहे. अश्विनने ७९ कसोटी सामन्यात ४१३ विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट २.८० इतका राहिला आहे.
A special moment for @ashwinravi99 as he gears up to play his 5⃣0⃣th T20I. 👏 👏#TeamIndia #INDvNZ @Paytm pic.twitter.com/h5iPSssPZq
— BCCI (@BCCI) November 17, 2021
याशिवाय अश्विनने आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारात फलंदाजीतही दमदार कामगिरी केली आहे. त्याने ४९ सामन्यात ३० च्या सरासरीने १२३ धावा केल्या आहेत. याशिवाय १११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याने १६.१ च्या सरासरीने ६७५ धावा केल्या आहेत. अश्विनने ७९ कसोटी सामन्यात २६८५ धावा केल्या आहेत.
इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यावेळी या गोष्टीची खूप चर्चा झाली होती. यानंतर त्याची टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. तब्बल चार वर्षांनंतर त्याची भारतीय टी-२० संघात निवड झाली होती. परंतु त्याला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
बटलरला भोवली पंतची निर्भीड फलंदाजी; म्हणाला, ‘मीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अशीच दाणादण उडवेन’
रोहितने आत्तापर्यंत १९ टी२० सामन्यात केलं आहे भारतीय संघाचे नेतृत्व, वाचा त्याचे जय-पराजयाचे रिकॉर्ड