भारत आणि इंग्लंड यांच्यातील धरमशाला कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) सुरू होणार आहे. तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारी (8 मार्च) सुरू होणार आहे. या दोन दिवसात एकूण चार खेळाडू आपला 100 कसोटी सामन्यांटा टप्पा पार करणार आहेत. रविचंद्रन अश्विन, जॉनी बेअरस्टो, टिम साऊदी आणि केन विलियम्सन हे अनुक्रमे 7 आणि 8 मार्च रोजी आपला 100वा कसोटी सामना खेळतील. पण यादरम्यान मुळची भारतीय असणारे पंच नितिन मेनन यांच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला जाणार आहे.
विराट कोहली, स्टीव स्मिथ, जो रुट आणि केन विलियम्सन मागच्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू राहिले आहेत. या चौघांना ‘फॅब फोर’ असेही म्हटले जाते. विराट, स्मिथ आणि रुट यांनी आधीच आपल्या 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पार केला आहे. पण विलियम्सन शुक्रवारी (8 मार्च) ही कामगिरी नावावर करेल. नितीन मेनन (Nitin Menon) या सामन्यात पंच असतील. विशेष म्हणजे विराट, स्मिथ आणि रुट यांच्या 100व्या कसोटी सामन्यात देखील मेनन पंच म्हणून जबाबदारी पाहत होते.
मेनन यायंनी सर्वात आधी जो रुट याच्या 100व्या कसोटी सामन्यात पंचाची भूमिका पार पाडली. 5 फेब्रुवारी 2021 मध्ये हा सामना चेन्नईत पार पडला. त्यानंतर विराट कोहली याने आपला 100वा कसोटी सामना 4 मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये खेळला. याही सामन्यात मेनन पंच होते. 6 जुलै 2023 मध्ये स्टीव स्मिथ यानेही 100वा कसोटी सामना खेळला आणि मेनन पंच म्हणून जबाबदारी पाहत होते. आता केन विलियम्सनच्या 100व्या कसोटीवेळीही मेनन पंच म्हणून जबाबदारी पाहतील.
मुळचे भारतीय असणारे नितीन मेनन आयसीसी एलिट पॅनलचा भाग आहेत. मैदानात अचूक निर्णय देण्यासाठी त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्याती आहे. खूपच कमी वेळा त्यांनी दिलेला निर्णय चुकीचा ठरतो. कमी वयात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण आता पंच म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान त्यांनी तयार केले आहे. (A special record can be recorded in the name of umpire Nitin Menon in the Dharamsala Test )
महत्वाच्या बातम्या –
Rohit Sharma । क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे निधन, क्रीडाविश्वात शोककळा
धर्मशाला कसोटीत इंद्रदेव येईल ‘साहेबां’च्या मदतीला? जाणून घ्या हवामानाचा अंदाज