पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यांत सुधांशु मेडसीकर ( 4400पॉईंट्स, रावेतकर कॉमेट्स), तेजस चितळे (3700पॉईंट्स, हमद एअर चार्टर्स स्विफ्टस), प्रतीक धर्माधिकारी (3500पॉईंट्स, ऍक्चुअल फिनिक्स), प्रथम वाणी (3800पॉईंट्स, ब्लॅक हॉक्स), अनिश राणे (3100पॉईंट्स, ब्लॅक हॉक्स), आर्य देवधर (3000पॉईंट्स, बेलवलकर देवधर ऑस्प्रीज), तेजस किंजवडेकर (3100पॉईंट्स, इम्पेरिअल स्वान्स) हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 23 ते 28 ऑगस्ट 2022 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागु आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत नॉमिनेटेड खेळाडू गट, महिला गट, वाईजमन गट आणि खुला गट अशा विविध गटातून 160 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणी करण्यात आली आहे.
या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. कारण या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो असे आश्विन त्रिमल यांनी सांगितले.
एक खेळाडू टायमध्ये फक्त 1 सामना खेळू शकणार आहे. प्रत्येक टायमध्ये 6 सामने खेळण्यात येणार आहेत. सर्व सामने हे बेस्ट ऑफ थ्री पद्धतीत खेळविण्यात येणार असून पहिल्या दोन सामन्यात बरोबरी झाल्यास निर्णायक सामना खेळविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार असून दोन गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले. रणजित पांडे स्पर्धा संचालक म्हणून काम पाहतील.
या वर्षीच्या स्पर्धेचे वौशिष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेत सर्वाधीक 160 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीने स्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एक सामना खेळल्यास या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत.
10 संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी 5 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी सामना खेळणार आहे. साखळी फेरीतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेचे सामने खुला दुहेरी 1, खुला दुहेरी 3, खुला मिश्र दुहेरी गट, वाईज पुरुष दुहेरी, खुला दुहेरी 4, खुला दुहेरी 2 या अशा गटांमध्ये सामने होणार आहेत.
स्पर्धेतील दहा संघांतील खेळाडूंची निवड हि लिलावपद्धतीने करण्यात आली आहे. या संघांमध्ये ऍक्चुअल फिनिक्स, बेलवलकर देवधर ऑस्प्रीज, ब्लॅक हॉक्स, ब्लेझिंग ग्रिफिन्स, ईगल्स, हमद एअर चार्टर्स स्विफ्टस, इम्पेरिअल स्वान्स, रावेतकर कॉमेट्स, सेइनुमेरो जालन गोशॉक, अर्बन रेव्हन्स हे 10 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले.
स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये तन्मय आगाशे, तुषार नगरकर, अभिषेक ताम्हाणे, रणजित पांडे, सिद्धार्थ निवसरकर, देवेंद्र चितळे,नंदन डोंगरे, कपिल खरे यांचा समावेश आहे.
स्पर्धेतील सहभागी संघांची व संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
ऍक्चुअल फिनिक्स: तन्मय चोभे, सारा नवरे, आनंदिता गोडबोले, गौरी कुलकर्णी, अश्विन हळदणकर, कौस्तुभ वाळिंबे, राहुल गांगल, नीरज दांडेकर, गंधार देशपांडे, अजिंक्य मुठे, अभिजीत खानविलकर, प्रतीक धर्माधिकारी, अनुज मेहता, अक्षय कश्यप, सुदर्शन बिहानी, कर्ना मेहता, यश शहा, हर्षा जैन;
बेलवलकर देवधर ऑस्प्रीज: आर्य देवधर, नकुल बेलवलकर, तुषार नगरकर, भाग्यश्री देशपांडे, सलोनी केळकर, चैत्राली नवरे, संजय फेरवाणी, विनायक भिडे, संदीप साठे, शैलेश बोथरा, देवेंद्र चितळे, अमोल मेहेंदळे, क्षितिज कोतवाल, आनंद शहा, रोहित भालेराव, गिरीश मुजुमदार, कुणाल पाटील, राहुल चिंचोरे;
ब्लॅक हॉक्स: राधिका इंगळहळीकर, तन्मय आगाशे, प्रथम वाणी, अनिश राणे, शरयू राव, संजना पाटील, प्रशांत पंत, आनंद घाटे, अभिजीत गानू, आशुतोष सोमण, विनित रुकारी, सोहम कांगो, नैमिश पालेकर, तन्मय चितळे, इशान पारेख, निखिल कानिटकर, रोहित साठे;
ब्लेझिंग ग्रिफिन्स : विक्रांत पाटील, आकाश सूर्यवंशी, श्रीदत्त शानबाग, ईशा भिडे, आरुषी पांडे, राहुल पाठक, जयकांत वैद्य, आदित्य देशपांडे, स्वरूप कुलकर्णी, हर्षवर्धन आपटे, विमल हंसराज, कपिल बाफना, इशान भाले, निखिल चितळे, करण पाटील, ईशान लागु, राजेंद्र नाखरे, आरीन माळी, गौरी खरे;
ईगल्स: अमित देवधर, ईशा साठे, बिपीन देव, रुचा ढवळीकर, इरा आपटे, हेमंत पालांडे, मंदार विंझे, प्रशांत वैद्य, कुणाल जावडेकर, चिन्मय चिरपुटकर, नीलेश केळकर, पार्थ केळकर, पार्थ किल्लेदार, बिपीन चोभे, संग्राम पाटील, रोहन पटवर्धन, चैतन्य रहातेकर;
हमद एअर चार्टर्स स्विफ्ट्स: अभिजित राजवाडे, ऋषिकेश पेंडसे, मधुर इंगहळीकर, शताक्षी किणीकर, राधा चिरपुटकर, संदीप तपस्वी, सचिन अभ्यंकर, विवेक जोशी, नीलेश बजाज, आदित्य गांधी, गौतम मालकर्णेकर, विश्वेश कटक्कर, चिनार ओक, तेजस चितळे, चंद्रशेखर आपटे, मौलिक कोटक, संध्या भट, सुचित्रा जोशी;
रावेतकर कॉमेट्स: पराग चोपडा, आदिती रोडे, सिद्धार्थ साठे, प्रिती फडके, अतुल ठोंबरे, बाळ कुलकर्णी, देवेंद्र राठी, यश मेहेंदळे, सुधांशू मेडसीकर, आदित्य पावनगडकर, अमोल दामले, सिद्धांत खिंवसरा, समीर जोग, नचिकेत जोशी, संकल्प गोयल, ऋषिका आपटे
सेइनुमेरो जालन गोशॉक: समीर जालन, तुषार मेंगळे, सिद्धार्थ निवसकर, सारा ठाकूर, आकर्शिता मेनन-जोशी, गिरीश खिंवसरा, हरीश अय्यर, अविनाश दोशी, मकरंद चितळे, अमर अरविंद श्रॉफ, सिद्धार्थ बदामीकर, मिहीर विंझे, योहान खिवंसरा, अनिकेत सहस्त्रबुद्धे, कृष्णा मेहता, कीर्ती अमर श्रॉफ
अर्बन रेव्हन्स: केदार नाडगोंडे, प्रांजली नाडगोंडे, राजश्री भावे, वृषी फुरिया, मनीष शहा, आमोद प्रधान, अनिल देडगे, नितीन कोंकर, निखिल शहा, मिहीर आपटे, सारंग आठवले, जयदीप गोखले, आदर्श बोथरा, साहिल ठाकरे, शिवकुमार जावडेकर, श्री शिरोडकर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी कर्णधाराचा आणखी एक विक्रम! नेदरलँडविरुद्ध एकेरी खिंड लढवत रचला इतिहास
‘त्याला विश्रांती कशाला?’ माजी दिग्गजाने बीसीसीआयला फटकारले
‘आता तरी त्यांना संधी द्या’; विश्वविजेत्या फलंदाजाची टीम मॅनेजमेंटकडे मागणी