सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या (Border Gavaskar Trophy) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघात गरमागरमी पाहायला मिळाली. तत्पूर्वी आयपीएल 2025च्या लिलावासाठी फारसा वेळ उरला नाही. पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्याचा तो तिसरा दिवस असेल. त्याचा परिणाम सामन्याच्या पहिल्याच दिवशी दिसून आला. दरम्यान याची झलक ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लायन (Nathan Lyon) आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील विनोदी संभाषणात दिसली.
भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजी करत असताना नाथन लाॅयनने त्याला विचारले, “तू लिलावात कुठे जाणार आहेस?”, ज्यावर या रिषभ पंतने उत्तर दिले की, “काही कल्पना नाही.”
SOUND ???? Just two old friends meeting! ????????
Don’t miss this stump-mic gold ft. ????????????????????????????-????????????????????! ????
???? #AUSvINDOnStar ???? 1st Test, Day 1, LIVE NOW! #AUSvIND #ToughestRivalry pic.twitter.com/vvmTdJzFFq
— Star Sports (@StarSportsIndia) November 22, 2024
रिषभ पंत (Rishabh Pant) आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा कर्णधार होता. पण यावेळी फ्रेंचाइजीने त्याला लिलावापूर्वी सोडले आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी दिल्लीने अक्षर पटेल (Axar Patel), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) आणि अभिषेक पोरेल (Abhishek Porel) यांना कायम ठेवले आहे.
रिषभ पंतला (Rishabh Pant) दिल्लीने 2016ला 1.9 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते. तेव्हापासून तो दिल्ली फ्रॅचायझीचा भाग होता. पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) 111 सामने खेळले. त्यामध्ये त्याने 3,284 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले. 2023 मध्ये तो दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता. डिसेंबर 2022 मध्ये त्याचा कार अपघात झाला होता. नंतर बऱ्याच कालावधीनंतर त्याने 2024 मध्ये पुनरागमन केले आणि 2024च्या आयपीएल हंगामात 446 धावा केल्या. पण पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; केएल राहुलवर कारवाई करणार आयसीसी? नेमकं प्रकरण काय?
IND vs AUS; “लवकर बाद कर लंडनला…” विराट बाद झाल्यानंतर चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल!
आता या चॅनलवर पाहा आगामी आशिया कपचे सामने, तब्बल इतक्या कोटींचा करार!






