पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी संघाला 6 डिसेंबरपासून पंतप्रधान इलेव्हनविरुद्ध चार दिवसीय सामना खेळायचा आहे. दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ जोरदार तयारी करत आहे. मात्र, या तयारीदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. वास्तविक, नेट प्रॅक्टिस दरम्यान संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद आणि सौद शकील यांच्यामध्ये आपापसात जोरदार वाद होताना दिसले.
वृत्तानुसार, पंतप्रधान इलेव्हन विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघ कॅनबेरामध्ये प्रशिक्षण सराव करत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed) आणि सौद शकील (Saud Shakeel) एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे. व्हिडीओमध्ये सर्फराज आणि शकीलमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सर्फराज अहमद सौद शकीलला काही तरी बोलताना दिसत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये शकील आधी सरफराजला म्हणतो, ‘किती दिवस मी तुझ्या कामाला येईल?’ शकीलचे हे ऐकून सरफराजला राग येतो आणि तो म्हणतो, ‘तुझा मला काहीही उपयोग होणार नाही आणि सर्वप्रथम मी तुला काहीच सांगितले नाही. मी तुला कधीही आदला-बदली करण्याची विनंती केली नाही.
https://twitter.com/hesy_rock/status/1731715002816721304?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1731715002816721304%7Ctwgr%5E29378a43b63102b222c3d2d56c99584a48da898e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Faus-vs-pak-sarfaraz-ahmed-saud-shakeel-engage-in-a-verbal-duel-during-practice-session-watch-viral-video
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाची ही भांडणे संघातील वातावरणासाठी चांगली नाहीत. व्हिडिओ समोर आल्यानंतर, चाहत्यांना आशा आहे की, सरफराज अहमद आणि सौद शकील यांच्यात लवकरच सर्व काही सुरळीत होईल.
पाकिस्तान संघाने अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. अशा स्थितीत यावेळी नवा कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली संघ आपला खराब रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. (A video of an argument between two Pakistan players before the start of Australia tour has surfaced)
महत्वाच्या बातम्या
ठरलंय! डू प्लेसिस करतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक, टी-20 वर्ल्डकपवर दिग्गजाची नजर
आनंदाची बातमी! पूर्ण होणार स्टेडियममधून आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न, एमसीएची मोठी घोषणा