ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नुकतीच आंनदाची बातमी आली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा बुधवारी(३० डिसेंबर) भारतीय संघात समील झाला आहे. त्याचा भारतीय संघात सामील होतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा कसोटी सामना जिंकलेला भारतीय संघ अजूनही मेलबर्न शहरातच आहे. त्यामुळे रोहितही सिडनीमधील आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन मेलबर्न येथे भारतीय संघात सामील झाला. तो जेव्हा मेलबर्नमध्ये आला तेव्हा त्याचे भारतीय संघाकडून मोठ्या उत्साहाने स्वागत झाले.
यावेळी भारतीय संघातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ सदस्यांनीही रोहितची भेट घेतली. रोहितला परत आलेला पाहून प्रत्येकजण उत्साही आणि आनंदी दिसत होता. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील रविंद्र जडेजा, वृद्धिमान साहा असे काही खेळाडू रोहितबरोबर हसून मस्ती करतानाही दिसले. तसेच रोहित संघातील टी नटराजनसह अन्य खेळाडूंनाही भेटला. याबरोबरच तो प्रशिक्षक रवि शास्त्री आणि प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेबरोबरही हलक्या-फुलक्या गप्पा मारताना दिसत आहे.
Look who's joined the squad in Melbourne 😀
A warm welcome for @ImRo45 as he joins the team 🤗#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/uw49uPkDvR
— BCCI (@BCCI) December 30, 2020
रोहित ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर मागील १४ दिवस सिडनी येथे क्वारंटाईनमध्ये होता. त्यानंतर त्याचा बुधवारी क्वारंटाईन कालावधी संपला. त्यामुळे आता तो ७ जानेवारीपासून सिडनीत सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
रोहितने मागील महिन्यात मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वाखाली ५ वे आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. याचदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने भारतात परतल्यानंतर बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर काम केले. त्याचमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेत खेळता आले नाही. तसेच त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांही मुकावे लागले. पण आता तो पुन्हा भारतीय संघात परतल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ विराट-धोनीला करता आलेला ‘तो’ विक्रम आता रविंद्र जडेजाच्याही नावावर!
“ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून रहाणेची स्तुती ऐकून मी भारावलो”, भारतीय दिग्गजाचे विधान
मेलबर्न कसोटीतील विजयानंतर सौरव गांगुलीने ट्विट करत केले भारतीय संघाचे अभिनंदन, म्हणाला…