भारतीय संघ शुक्रवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे व त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. याव्यतिरिक्त पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचा दुसरा संघ शिखर धवनच्या नेतृत्वखाली श्रीलंका दौरा करणार आहे. या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून महान भारतीय फलंदाज राहुल द्रविडला निवडण्यात आले आहे.
विश्व क्रिकेटमध्ये राहुल द्रविड हा एक फलंदाज म्हणून महान आहेच. मात्र त्याच्या व्यक्तिमत्वामुळे देखील तो लोकप्रिय आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एक प्रशिक्षक म्हणून पण तो चांगली कामगिरी करत आहेत. द्रविड हा क्रिकेट विश्वातील सर्वात शांत खेळाडूंमधून एक आहे. द्रविडला मैदानाच्या बाहेरही त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखले जाते.
याच कारणामुळे राहुल द्रविडच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी होती. त्याच्या शांत स्वभावामुळे महिला व मुलींमध्ये देखील तो लोकप्रिय होता. तो या गोष्टींपासून दूर राहत असला तरी क्रिकेटप्रेमी महिला त्याला नेहमी फॉलो करत असत. अशातच एक घटना राहुल द्रविडसोबत घडली होती. एका महिला चाहतीने थेट राहुल द्रविडच्या घरात प्रवेश केला होता. आणि त्यांनतर घरातून निघून जाण्यास देखील तिने नकार दिला होता.
या घटनेचा खुलासा खुद्द राहुल द्रविडनेच एका मुलाखतीत केला. तो म्हणाला, “माझ्या आई वडिलांचे असे म्हणणे होते की मला भेटायला आलेल्या सर्व चाहत्यांना मी भेटावे आणि कोणी कॉल केला तर त्यांच्यासह पण मी बोलावे . एकदा मी मोठ्या दौऱ्यावरून घरी परतल्यानंतर सकाळी झोपलो होता. सायंकाळी उठल्यानंतर माझ्या आईने सांगितले की मला भेटायला एक महिला चाहती हैदराबाद वरून आली आहे. मी तिला भेटलो, मी ऑटोग्राफ दिला व एक फोटो ही काढला. परंतु त्यानंतर तिने घरातून जाण्यास नकार दिला. ती म्हणाली की, मी माझे घर सोडून आले आहे आणि मी आता इथेच राहील. तेव्हापासून माझ्या आई वडिलांना कळले की कोणालाही घरात प्रवेश द्यायचा नसतो.”
द्रविडने महिला चाहत्यांबद्दल बोलताना सांगितले की, “मला लग्नानंतर महिला चाहत्यांकडून राख्या मिळायच्या. महिला चाहत्या असणे चांगली गोष्ट आहे. माझ्या लग्नाआधी मला ‘वॅलेंटाईन्स डे’ला अनेक प्रेमपत्र यायचे. परंतु लग्न झाल्यानंतर मला महिला चाहत्यांच्या रक्षाबंधनच्या दिवशी राखी पाठवायला सुरुवात केली.”
महत्वाच्या बातम्या:
युवा शेफाली वर्माने रचला इतिहास, ठरली हा पराक्रम करणारी पहिली भारतीय खेळाडू
वाचाल तर वाचाल! सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडच्या खेळाडूंचा फोटो व्हायरल
WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द