भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मागील काही काळात उत्तम कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धाच्या पहिल्या कसोटीत जडेजाने फलंदाजीसह गोलंदाजीत सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यानंतर त्याच देशभरातून कौतुक होत आहे. यातच आता भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने (Aakash Chopra) रवींद्र जडेजाबद्दल आता मोठे व्यक्तव्य केले आहे. आकाश चोप्राच्या मते, जडेजाला बीसीसीआयच्या वार्षिक कराराच्या अ+ श्रेणीत जागा मिळायला हवी.
बीसीसीआयच्या सर्वोच्च अ+ श्रेणीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे आणि अ श्रेणीत जडेजा, रिषभ पंत, केएल राहुल, आर अश्विन आमि मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश आहे.
आकाश चोप्राचे म्हणणे आहे की, “जडेजाला त्याच्या सलग उत्तम खेळीमुळे अ+ श्रेणीत स्थान दिले जावे.” तो म्हणाला, ज्या श्रेणीमध्ये काहीच बदल झाला नाही, ती श्रेणी अ+ श्रेणी आहे. यामध्ये रोहित, विराट आणि बुमराह हे आहेत. मग जडेजा का नाही? मला वाटते की, या यादीत त्याचे नाव असायला हवे होते. पुढच्या वार्षिक कराराच्या यादीत अ+ श्रेणीत त्याचे नाव असेल. कारण, तो सलग चांगली कामगिरी करत आहे.”
आकाश चोप्राला जडेजाशिवाय राहुल आणि पंत यांना सुद्धा वार्षिक करारामध्ये अ+ श्रेणीत पाहायचे आहे. तो म्हणाला, “सध्या जडेजा अ श्रेणीत आहे. पुढच्या यादीत मला वाटते की, राहुल आणि जडेजा अ+ श्रेणीत असतील. पंत संघाचा उपकर्णधार होणार आहे. या सर्वांना अ+ श्रेणीत स्थान द्यायला हवे.”
रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीत पहिल्या डावात १७५ धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजीत त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ अश्या एकूण ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मागील काही काळात उत्तम कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! पाकिस्तानी महिला विकेटकीपरचा ‘अद्भूत’ झेल; चाहत्यांंना आली थेट ‘माही’च्या ‘त्या’ कॅचची आठवण
दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी
दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी