आयपीएल २०२२ हंगामातील साखळी फेरी शेवटच्या टप्प्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. आता अजून दोन जागांसाठी संघ संघर्ष करत आहेl. गुरुवारी (१९ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे, जी आरसीबीसाठी अत्यंत महत्वाची असेल. भारतीय संघाचा माजी दिग्गज आकाश चोप्राच्या मते प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी आरसीबीला हा सामना मोठ्या अंतराने जिंकावा लागणार आहे.
चालू आयपीएल हंगामात आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत आणि त्यांच्याकडे १४ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे देखील १४ गुण आहेत, पण नेट रन रेटच्या कारणास्तव आरसीबी त्यांच्या मागे आहे. आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच कारणास्तव म्हणाला की, आरसीबीला गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना मोठ्या अंतराने जिंकावा लागणार आहे.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला की, “जर आरसीबी जिंकली, तर त्यांचे १६ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी त्यांच्याकडे असेल. पण तरीही ते क्वालीफाय करतील याची खात्री नाहीये, कारण दिल्ली कॅपिटल्स देखील मुंबईविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून १६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे त्यांना नेट रन रेटचा विचार करून १६ गुण मिळवावे लागतील. हे मात्र नक्की आहे की, त्यांना १४ गुणांसह क्वालीफाय करता येणार नाहीये.”
आरसीबीचे महत्वाचे फलंदाज विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल चालू हंगामात अद्याप चमक दाखवू शकले नाहीत. याविषयी बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “आरसीबीने स्पर्धेच्या सुरुवातीला चांगले क्रिकेट खेळले आणि त्यांच्यात खूप संतुलन दिसत होते. पण प्रत्येक स्पर्धेत एक वेळ अशी येतेच, जेव्हा मोठ्या खेळाडूंना पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळेच कोहली, फाफ, मॅक्सवेलसारख्या खेळाडूंनी धावा केल्या नाहीत, तर संघाच्या विजयाची शक्यता खूप कमी होते.”
दरम्यान, आरसीबी आणि गुजरात टायटन्सचा हा सामना गुरुवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी साखळी फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जेव्हा अनेक महिन्यांनंतर आपल्या कुटुंबाला भेटला बटलर, पाहा आयपीएल २०२२मधील सर्वात इमोशनल व्हिडिओ
वृद्धिमान साहाचा मोठा निर्णय; म्हणाला, ‘आता मी त्यांच्यासोबत कधीच क्रिकेट खेळणार नाही’