भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीर आणि खेळाडूंमधील अनेक गोष्टी प्रसार माध्यमांत लीक झाल्या होत्या. यावर बीसीसीआयनं नाराजी व्यक्त करत खेळाडूंवर अनेक निर्बंध लादले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियात भारतीय खेळाडू एकत्र नव्हते तर वेगवेगळ्या गटात राहत होते. बोर्डानं गुरुवारी खेळाडूंसाठी 10 कठोर नियम लागू केले. यावर आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्रा यांनी संघाच्या अंतर्गत बाबी लीक होऊ नयेत यासाठी एक सूचना दिली.
बीसीसीआयच्या नवीन नियमांमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य, दौऱ्यांवर कुटुंब आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध आणि मालिकेदरम्यान वैयक्तिक जाहिरातींवर बंदी असे अनेक उपायांचा समावेश आहे. आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं की, केवळ भारतीय संघच नाही तर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आतील गोष्टीही लीक होत आहेत. आकाश चोप्रा यांनी सीतांशू कोटक भारताचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्याच्या वृत्ताचा उल्लेख केला. बोर्डानं अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
आकाश चोप्रा म्हणाले, “सर्वात मोठी बातमी म्हणजे सीतांशू कोटक भारताचे नवे फलंदाजी प्रशिक्षक बनले आहेत. त्यांना कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. बीसीसीआय कदाचित नंतर याची अधिकृत घोषणा करेल. परंतु या सगळ्या बातम्या बाहेर कशा येतात? बीसीसीआय स्वतः ते का जाहीर करत नाही? जर तुम्ही स्वत: समोर येऊन सांगायला सुरुवात केली, तर या स्रोतांवर आधारित बातम्या थांबू शकतात.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाले, “सितांशू कोटक हे बऱ्याच काळापासून कोचिंग सेटअपशी जोडलेले आहेत. ते माझ्याविरुद्धही खेळले आहेत आणि त्यांनी भरपूर धावा केल्या आहेत. त्यांची खेळण्याची शैलीही अनोखी होती. ते एक रन मशीन होते. ते त्यांच्या विचित्र कृत्यांनी विरोधी संघाला खूप त्रास द्यायचे.”
हेही वाचा –
रिंकू सिंहचा साखरपुडा झाला? समाजवादी पक्षाच्या खासदार सोशल मीडियावर चर्चेत
किरॉन पोलार्डनं इतिहास रचला! टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाला आणखी एक धक्का, हा खेळाडूही दुखापती