आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सर्व चाहत्यांच्या नजरा संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंवर आहेत. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी गुरुवारी जाहीर होईल. त्यापूर्वी अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे की, अनेक फ्रँचायझीनं आपल्या मोठ्या खेळाडूंना रिटेन न करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये केएल राहुल आणि रिषभ पंत यांसारख्या नावांचा समावेश आहे. पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असून राहुलनं गेल्या 3 हंगामात लखनऊचं कर्णधारपद भूषवलं होतं. आता या दोन खेळाडूंवर लिलावात मोठी बोली लागू शकते, असा विश्वास प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला.
बऱ्याच अहवालांमध्ये म्हटलं आहे की केएल राहुल आणि रिषभ पंत यांना त्यांचे संघ रिटेन करणार नाहीत. यामुळे दुसऱ्या फ्रँचायझी आगामी लिलावात त्यांच्यावर मोठ्या बोली लावू शकतात. या दोन खेळाडूंसाठी 25-30 कोटी रुपयांची बोली लावली जाऊ शकते, असं आकाश चोप्रा यांचं मत आहे.
आकाश चोप्रा म्हणाले, “रिषभ पंतला खूप पैसे मिळणार आहेत. ही रक्कम 25-30 कोटी रुपये असू शकते. केएल राहुलसोबतही असं होऊ शकतं. तो एक यष्टिरक्षक फलंदाज आहे जो दरवर्षी 500-600 धावा करतो. काही लोक त्याच्या स्ट्राइक रेटवर प्रश्न विचारतील. मी कुठेतरी एक मीम पाहिला होता की त्याचं वय 30 पेक्षा जास्त आहे. तो विवाहित आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की त्याचं करिअर संपलं. म्हणून सीएसके त्याला आपल्या संघात घेऊ शकते. कारण असे खेळाडू तिथे जातात.”
लखनऊ सुपर जायंट्स सोबत तीन वर्षांच्या कालावधीत केएल राहुलचा स्ट्राइक रेट 136.13 (616 धावा), 113.23 (274 धावा) आणि 135.38 (520 धावा) राहिला. पंतनं दिल्लीमध्ये ज्या सपोर्ट स्टाफसोबत काम केलं, त्यात मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग, टीम डायरेक्टर सौरव गांगुली आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांचा समावेश होता. परंतु यावर्षी त्यांनी संघाची साथ सोडली आहे.
हेही वाचा –
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन नवीन खेळाडूंना मिळाली संधी
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीची पिच कशी आहे? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड
जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही, टीम मॅनेजमेंटचा धक्कादायक निर्णय!