भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ सध्या दुसऱ्या टी-२० सामन्याची तयारी करत आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सोमवारी (१ ऑगस्ट) वॉर्नर पार्क येथे खेळवली जाणार आहे. भारताचा माजी दिग्गज आकाश चोप्राने त्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याच्या मते, दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच बदल होईल.
आकाश चोप्रा म्हणाले की, “काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे भारताला शोधावी लागतील.” त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणालाकी, “भारतीय संघासमोर काही मोठे प्रश्न आहेत. गेल्या सामन्यात मला वाटते की संघ व्यवस्थापनाने परिस्थिती चांगली वाचली होती आणि म्हणूनच त्यांनी तीन फिरकीपटूंना संधी दिली आणि त्या फिरकीपटूंनी त्यांचे काम केले. मात्र, या सामन्यासाठी संघात काही बदल करावे लागतील कारण येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “संजू सॅमसनला या सामन्यात संधी मिळाली आणि सलामीवीर म्हणून प्रयत्न केले तर श्रेयस अय्यरला संघातून वगळले जाऊ शकते. सॅमसन ओपनिंग करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.”
आकाश चोप्राच्या मते, या सामन्यासाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो फक्त दोन फिरकी गोलंदाजांची निवड करेल आणि तीन वेगवान गोलंदाज खेळतील. अश्विन आणि रवी बिश्नोई यांच्यापैकी कोणालाही वगळले जाऊ शकत. याशिवाय त्यांनी हर्षल पटेलला खेळवण्याबाबतही बोलले आहे.
दुसऱ्या T20 साठी आकाश चोप्राची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/संजू सॅमसन, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग/हर्षल पटेल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमधील दुषित वातावरणाचे कारण देत विंडीजच्या आणखी एका दिग्गजाने जाहिर केली निवृत्ती!
हुश्श! भारतीय संघ आता सेमिफायनलमध्ये पोहचणार, फक्त करावे लागेल ‘हे’ सोपे काम
मोईनला बाद करण्यासाठी स्टब्सचा अफलातून झेल, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल