---Advertisement---

“…म्हणून भारताने ऍडलेडमध्ये प्रकाशझोतातील सामना खेळू नये”, आकाश चोप्राने सांगितले कारण

On: शनिवार, डिसेंबर 12, 2020 8:06 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये गुरुवारपासून (१७ डिसेंबर) कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला गुलाबी चेंडू कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड मैदानावर होणार आहे. मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या मते भारतीय संघाने ऍडलेड येथे हा सामना खेळवण्याच्या निर्णयास नकार द्यायला पाहिजे होता. स्वत:च्या यूट्यूब चॅनलवर ते बोलत होते.

गुलाबी चेंडू कसोटी सामन्याचा जास्त अनुभव नाही
भारतीय संघाने यापुर्वी केवळ एकदा गुलाबी चेंडू कसोटी सामना खेळला आहे. बांग्लादेश संघाविरुद्ध मायदेशात हा सामना झाला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू गुलाबी चेंडू कसोटी सामना खेळण्यासाठी जास्त अनुभवी नाहीत. त्यातही हा मालिकेतील पहिलाच सामना असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत भर पडू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
असे असले तरी, भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सिडनी येथे ३ दिवसीय गुलाबी चेंडू सराव सामना खेळत आहे. त्यामुळे संघाला पहिल्या कसोटी सामन्यात याचा बराच फायदा होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले आकाश चोप्रा?
ऍडलेड मैदानावरील गुलाबी चेंडू कसोटी सामन्याविषयी बोलताना चोप्रा म्हणाले की, “भारत सिडनीमध्ये दिवसरात्र कसोटी सामना खेळू शकला असता. परंतु, गुलाबी चेंडू कसोटी सामन्यासाठी ऍडलेडचे मैदान योग्य नाही. या मैदानावर दिवसा सामना झाल्यास भारतीय संघाच्या विजयाच्या संभावना जास्त असत्या. कारण दिवसा या मैदानाची खेळपट्टी समान असते. परंतु गुलाबी चेंडू कसोटी सामन्यावेळी याच खेळपट्टीवर खेळणे अवघड जाते.”
“भारताचा अनुभवी कसोटीपटू अजिंक्य रहाणेने स्पर्धात्मक क्रिकेट खेळले आहे. परंतु, हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या खेळाडूंनी मागील ८ महिन्यांपासून क्रिकेट खेळलेले नाही. याच कारणामुळे ऍडलेड येथे गुलाबी चेंडू कसोटी सामना खेळल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो,” असे पुढे चोप्रा यांनी म्हटले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबर-२१ डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे होईल. पूर्ण कसोटी मालिकेतील हा एकमेव दिवसरात्र सामना असेल. अशात भारतीय संघ या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करण्यात यशस्वी होईल का नाही?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

IND Vs AUS A: सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विहारी आणि पंतचे शतक, भारतीय संघाला दमदार आघाडी

Ind vs Aus A: शुभमन गिलचे दमदार अर्धशतक, दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत

भारताला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात नवीन शिलेदार; देशांतर्गत क्रिकेटमध्ये नुकतेच ठोकले द्विशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---