आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात यजमान संघावर चेन्नईने एकतर्फी वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी उभारलेल्या विक्रमी धावसंख्येचा गोलंदाजांनी बचाव करत 49 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. सीएसकेचा हा फॉर्म पाहता माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने चेन्नईला यंदा विजेतेपदाचे दावेदार म्हटले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा या स्पर्धेतील आत्तापर्यंतचा फॉर्म जबरदस्त राहिला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर चेन्नईने सलग दोन विजय मिळवले. त्यानंतर राजस्थानविरुद्ध त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र पुन्हा त्यांची गाडी विजयी रुळावर आली व त्यांनी सलग तीन विजय आपल्या नावे केले. संघाचा हाच फॉर्म पाहता आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला,
“चेन्नईने सात पैकी पाच सामने जिंकल्याने त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यांनी विरोधी संघांच्या घरच्या मैदानावर जात विजय मिळवलेत. आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर ते मजबूत आहेत. त्यांचे चेन्नईतील सामने शिल्लक असल्याने, ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर साखळी फेरी समाप्त करतील. तसेच क्वालिफायर व एलिमिनेटर सामने चेन्नईत होणार असल्याने, सीएसके अंतिम सामना खेळण्याची शक्यता वाढली आहे.”
सीएसके आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले असून, या चारही वेळी एमएस धोनी संघाचा कर्णधार होता. यावर्षी विजेतेपद जिंकून मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांची बरोबरी करण्याची संधी त्यांच्याकडे असणार आहे.
(Aakash Chopra Said CSK Have Great Chance To Play IPL 2023 Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये