कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज (INDVWI ODI Series) यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाला ६ गडी राखून लोळवत मालिकेची विजय सुरुवात केली. भारतीय संघाने उत्कृष्ट संगीत कामगिरी करत हा विजय संपादन केला. या सामन्यातून युवा अष्टपैलू दीपक हूडा (Deepak Hooda) याने भारतासाठी पदार्पण केले. तसेच, फलंदाजीत अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने विजया ते योगदान दिले. मात्र, त्यानंतर भारताचे माजी सलामीवीर व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत संघ व्यवस्थापनावर ताशेरे ओढले.
दीपकने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
बडोदा संघासाठी अनेक वर्ष खेळल्यानंतर मागील वर्षी राजस्थानचे प्रतिनिधित्व करणारा अष्टपैलू दीपक हूडाने रविवारी (६ फेब्रुवारी) भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण (Deepak Hooda Debute) केले. आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर हूडाला ही संधी मिळाली. तो भारताचा २४३ वा वनडे क्रिकेटपटू ठरला. दीपकला या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. त्याने सुर्यकुमार यादवसह अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात २६ धावा केल्या.
आकाश चोप्रा यांची टीका
दीपक हुडा हा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र, त्याला या सामन्यात एकही षटक गोलंदाजी करण्यासाठी दिले नाही. हाच धागा पकडून आकाश चोप्रा यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले,
Venkatesh Iyer earlier. Hooda today. Kinda impossible to create all-rounders if they won’t get to bowl…Or…perhaps, selectors are picking players as all-rounders but the team management has little or no faith in their bowling abilities. #IndvWI
— Aakash Chopra (@cricketaakash) February 6, 2022
‘आधी वेंकटेश अय्यर व आता दीपक हूडा. गोलंदाजीची संधी दिली नाही तर अष्टपैलू खेळाडू बनणे कठीण आहे. कदाचित निवड समितीने निवडलेल्या खेळाडूंवर संघ व्यवस्थापनाला विश्वास नाही.’
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुन्हा युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यर याला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याला पहिल्या सामन्यात गोलंदाजीची संधी दिली गेली नाही. तर, दुसऱ्या सामन्यात त्याने केवळ दोन षटके गोलंदाजी केली होती.
महत्वाच्या बातम्या-