---Advertisement---

माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…”

On: सोमवार, जुलै 25, 2022 6:44 PM
Jay-Shah
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. सातत्याने विदेश दौऱ्यांवर भारतीय संघाला यश मिळतेय. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली तरीही भारतीय संघ यशस्वी होतोय. भारतीय संघाच्या या कामगिरीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा हे खूप आनंदी आहेत. त्यांनी या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले होते. मात्र, त्यांच्या त्या कौतुकास्पद विधानाला आता एका माजी भारतीय खेळाडूने उत्तर दिले आहे.

काय म्हणाले शहा?

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने वनडे मालिका आपल्या नावे केली आहे. भारताच्या या कामगिरीनंतर जय शहा यांनी खुश होत म्हटले होते,

“भारताची बेंच स्ट्रेथ इतकी मजबूत आहे की, आपण एकाच वेळी चार संघ तयार करून चार वेगवेगळ्या मालिका खेळू शकतो. खेळाच्या सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी आपल्याकडे ५० खेळाडू तयार आहेत. जे एनसीएत व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत.”

शहा यांच्या या प्रतिक्रियेनंतर भारताचा माजी सलामीवीर व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने एक विधान केले. तो म्हणाला,

“बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले होते की, व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मदतीने ते ५० खेळाडूंचा पूल तयार करत आहेत. याचा भारतीय म्हणून तुम्हाला अभिमान वाटेल. मात्र, तुम्हाला त्यातील धोके देखील ओळखता आले पाहिजेत. मागील वर्षी श्रीलंकेला दुसऱ्या दर्जाचा संघ पाठवला गेला. तेथे चेतन सकारिया, देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांनी पदार्पण केले. तेथील संघाची कामगिरी पाहून सर्वजण उत्सुक होते. मात्र, २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारताला एकही मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे अचानक तुमच्या लक्षात येते की, हा एक रियालिटी चेक आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी 

‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून प्रचलित अख्तरच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची घोषणा, ‘या’ दिवशी होणार रिलीज 

सिनियर्सच्या अनुपस्थितीत यंगस्टर्सनी दाखवला दम; रोहित-विराटला आता… 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---