भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममधून जात आहे. टी20 क्रिकेटमध्ये तर तो अक्षरशः धावांचा रतीब घालताना दिसतोय. टी20 विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने मालिकावीर पुरस्कार मिळाला. त्याच्या याच शानदार फॉर्मचा फायदा करून घेण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन त्याचा समावेश कसोटी संघात करू शकते. याबाबत चर्चा देखील जोरात सुरू आहे. मात्र, त्याचवेळी कसोटी क्रिकेटसाठी आपण टी20 क्रिकेटचा सूर्यकुमार गमावू नये असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने व्यक्त केले.
भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरू होईल. या दौऱ्यावर तीन वनडे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा अद्याप तंदुरुस्त न झाल्याने कसोटी संघात सूर्यकुमारची वर्णी लागू शकते. सूर्यकुमार भारतीय संघासाठी पदार्पण केल्यापासून उत्कृष्टरित्या खेळताना दिसतोय. तसेच तो सध्या टी20 क्रमवारीतही अव्वलस्थानी आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्याला कसोटी खेळण्याची देखील इच्छा असल्याचे म्हटलेले.
याच पार्श्वभूमीवर बोलताना आकाश चोप्रा आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हणाला,
“सूर्यकुमार दर्जेदार खेळाडू आहे यात वाद नाही. त्याने जसा खेळ दाखवला आहे तसा खेळ दक्षिण आफ्रिकेसाठी एबी डिव्हिलियर्सने 10-12 वर्ष दाखवला. सूर्या आत्ताच आला आहे. तुम्ही कसोटीतला सूर्यकुमार शोधण्यासाठी टी20 मधील सूर्यकुमारचा बळी देऊ शकत नाही. तुमच्याकडे अगदीच पर्याय नसतील तर हा निर्णय योग्य असेल. मात्र, पर्याय उपलब्ध असतील तर हा निर्णय घेऊ नये.”
सूर्यकुमारने आत्तापर्यंत मुंबईसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळताना चांगली कामगिरी केलेली दिसून येते. त्याने मुंबईसाठी 77 प्रथमश्रेणी सामने खेळताना 44.01 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 14 शतके देखील आलीत.
(Aakash Chopra statement on Suryakumar Yadav test Debute)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरननंतर आता कोण करणार वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व? ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत
भारत- बांगलादेशमधील तिसऱ्या वनडेच्या दिवशीच आंदोलन, यजमानांच्या बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय






