भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धा खेळत आहे. साखळी फेरीतून पुढे गेल्यानंतर भारतीय संघ आता रविवारी (10 सप्टेंबर) सुपर फोर फेरीतील आपला पहिला सामना खेळेल. भारतीय संघाला या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करायचे आहेत. या सामन्याआधी भारताचा माजी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा याने भारतीय संघाला सल्ला दिलेला आहे.
उभय संघातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन व हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकांमुळे 266 धावा उभ्या केलेल्या. मात्र, त्यानंतर पावसाच्या आगमन झाल्याने पाकिस्तानचा संघ फलंदाजी करू शकला नाही. असे असले तरी दोन्ही संघ आता सुपर फोर फेरीत झुंजताना दिसणार आहेत.
या सामन्याआधी बोलताना चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला,
“मला वाटते की तुम्ही गोलंदाजीत नक्कीच बदल करू शकता. शार्दुल ठाकूरऐवजी तुम्ही मोहम्मद शमीची सेवा घ्यावी. तुमच्याकडे किमान तीन उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असले पाहिजेत. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करून तुम्ही पाकिस्तानला हरवू शकत नसल्यामुळे तुम्हाला बळी घेत रहावे लागतील. जर तुम्हाला पाकिस्तानला हरवायचे असेल तर तुम्हाला चांगल्या वेगवान गोलंदाजांची गरज आहे. जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर सतत दबाव आणू शकाल.”
या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी, आयोजकांनी त्यासाठी राखीव दिवस ठेवलेला आहे. सुपर 4 मधील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवलेला. तर भारत आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल.
(Aakash Chopra Suggest Team India Playing Shami Ahead Shardul Against Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
श्वानप्रेमी विराट! प्रॅक्टिस सेशनमध्ये दाखल झालेल्या पपीचा केला लाड, खेळला फुटबॉल
“धोनी साक्षात देवासारखा!”, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने सांगितला आयपीएलचा ‘तो’ अनुभव