---Advertisement---

कन्फर्म! पुढच्या हंगामात मुंबई करणार ‘या’ ४ खेळाडूंना ‘जय महाराष्ट्र?’

On: शुक्रवार, मे 27, 2022 7:19 PM
Mumbai-Indians
---Advertisement---

आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची या हंगामातील कामगिरी निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सला या मोसमात १० पराभवांचा सामना करावा लागला आणि पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आता पुढील हंगामासाठी मुंबईने काही खेळाडूंना घरचा रस्ता दाखवत नवीन खेळाडूंना आपल्या संघात घ्यावं असा सल्ला माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा याने दिला आहे. 

मुंबई इंडियन्सच्या या हंगामात संघातील संतुलनाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. संपूर्ण हंगामात, ब्लू आर्मीने संतुलन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते सापडले नाही. अशा परिस्थितीत आता पुढील हंगामात ही फ्रँचायझी निश्चितपणे काही बदल करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. त्यासाठी चार खेळाडूंना संघातून बाहेर काढून नवीन खेळाडू विकत घ्यावे, असे आकाश चोप्राने सांगितले आहे. 

आकाश चोप्राने सांगितल्याप्रमाणे, “पुढच्या हंगामात कायरन पोलार्डबद्दल जास्त विचार करू नका, पोलार्डची कारकीर्द संपुष्टात आली आहे, असा त्याचा विश्वास आहे. याशिवाय मुरुगन अश्विनला, जयदेव उनाडकट आणि टायमल मिल्सला मुंबईने अलविदा म्हणावे आणि त्यातून येणाऱ्या पैशातून नवीन खेळाडू खरेदी करत चांगली संघबांधणी करावी,” असे मत आकाश चोप्राने व्यक्त केले आहे.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवातीपासूनच लयीत दिसला नाही. ५ वेळचा चॅम्पियन संघ संपूर्ण हंगामात संघर्ष करत होता. त्यामुळे त्याला सलग दुसऱ्या सत्रात प्लेऑफमधील स्थान हुकले आहे. मात्र, पुढच्या हंगामासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू आणि नवीन जोशात पुनरागमन करू असा विश्वास संघ व्यवस्थापनाकडून व्यक्त केला जात आहे. 

व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आरसीबीच्या विजयासाठी ‘या’ खेळाडूची विकेट होती सर्वात महत्त्वाची, दिनेश कार्तिकने सांगितले नाव

टीम इंडिया एशिया कपच्या सुपर फोरमध्ये दाखल; इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारत पाकिस्तानला केले बाहेर

‘…तर उमरान मलिक भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो’, बासीसीआय अध्यक्ष गांगुलीने केले स्पष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---