---Advertisement---

भारतीय दिग्गजाने निवडला सनराइजर्स हैद्राबाद प्लेइंग इलेव्हन, १३०२ धावा करणाऱ्या फलंदाजाला नाही दिले स्थान

On: शुक्रवार, सप्टेंबर 11, 2020 8:01 PM
---Advertisement---

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सनराइजर्स हैद्राबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. त्याने संघात अधिकतर युवा फलंदाजांना संधी दिली आहे. तर, गोलंदाजांची निवड करताना अनुभवींना जास्त प्राथमिकता दिली आहे. Aaksh Chopra Selected Sunrisers Hydrabad Playing Xi

आपल्या फेसबुक पेजवरील व्हिडिओद्वारे त्याने सनराइजर्स हैद्राबादचा प्लेइंग इलेव्हन संघ निवडला. दरम्यान त्याने संघात बऱ्याच महत्त्वपूर्ण खेळाडूंची निवड केली. चोप्राने सर्वप्रथम हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची निवड केली. त्यानंतर त्याने यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोची निवड केली.

त्यांच्याविषयी बोलताना चोप्रा म्हणाला की, “मी कर्णधार वॉर्नर आणि यष्टीरक्षक बेयरस्टोपासून सुरुवात करतो. ते दोघेही आयपीएलचे दिग्गज आहेत. त्यांची आकडेवारी भारतीय फलंदाजांपेक्षाही चांगली आहे.” तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने मनिष पांडेची आणि चौथ्या क्रमांकासाठी विजय शकंरची निवड केली.

तर, ५व्या क्रमांकावर चोप्राने विराट सिंगला स्थान दिले. विराट हा चौकार-षटकार मारण्यात माहीर आहे. परंतु, त्याला आतापर्यंत आयपीएलमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, गेल्या ५ वर्षांपासून हैद्राबादचा भाग असणाऱ्या न्यूझीलंडच्या दमदार फलंदाज केन विलियम्सनला चोप्राने संघात स्थान दिलेले नाही. त्याने आतापर्यंत हैद्राबादकडून ४१ सामने खेळत १३०२ धावा केल्या आहेत. विलियम्सनने हैद्राबादचे नेतृत्त्वदेखील केले होते.

पुढे हैद्राबाद संघातील गोलंदाजांची निवड करताना चोप्राने ३ फिरकीपटूंना निवडले. युएईतील परिस्थितींनुसार त्याने मिचेल मार्शच्या ठिकाणी मोहम्मद नबीची निवड केली. कारण नबी हा एक दमदार फिरकी गोलंदाज आहे. तर, राशिद खान आणि शाहबाज नदीम या इतर २ फिरकीपटूंची त्याने निवड केली. तर, वेगवान गोलंदाजांमध्ये चोप्राने भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्माची निवड केली.

असा आहे आकाश चोप्राने निवडलेला सनराइजर्स प्लेइंग इलेव्हन संघ

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, विजय शंकर, विराट सिंग, मोहम्मद नबी, राशिद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि संदिप शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या –

सीएसकेचा अष्टपैलू शेन वॉट्सनने सुरेश रैना बाबत मोठे विधान; म्हणाला रैनाची जागा…

सरांबरोबर शूट! या दिग्गज खेळाडूंबरोबर चहलने बनविला मजेशीर व्हिडीओ

व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडलेला १८ वर्षीय फलंदाज यंदा उडवणार मोठ-मोठ्या फिरकीपटूंचे होश, ठोकलेत २ शतके

ट्रेंडिंग लेख –

एकेवेळी व्हिडीओ गेमच्या नादी लागलेली अकोल्याचा वाघ गाजवणार आयपीएल

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---