---Advertisement---

‘त्यांच्या जागी संजूच हवा होता”, आशिया चषकासाठीच्या संघावर माजी खेळाडूची टीका

---Advertisement---

आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघ श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत आपले आव्हान सादर करेल. या संघासह संजू सॅमसन हा राखीव खेळाडू म्हणून असेल. मात्र, भारताचा माजी सलामीवीर व क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा याने त्याला मुख्य संघातच जागा मिळायला हवी होती असे म्हटले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान संजू सॅमसनची कामगिरी तितकी चांगली नव्हती. एक-दोन डाव सोडले तर उर्वरित सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला होता. अनेकदा चाहते संजूला संधी मिळत नसल्याची तक्रार करत होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसनला पूर्ण संधी मिळाली असली तरी त्याला या संधीचा फायदा उठवता आला नाही.  कदाचित त्यामुळेच त्याला आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.  तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला.

भारतीय संघाच्या संघनिवडीवर बोलताना तो म्हणाला,

“आशिया चषक संघनिवडीवरील मोठी बातमी म्हणजे संजू सॅमसनचे नाव संघात नाही. तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार यादव यांच्या जागी तो संघात येऊ शकला असता.  तो १७ सदस्यीय संघाचा भाग होऊ शकला असता. सॅमसनची वनडेमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त आहे आणि त्याने वेस्ट इंडिजमध्येही अर्धशतक झळकावले आहे.”

संजू आशिया चषकासाठी भारतीय संघासोबत असणार आहे. केएल राहुल दुखापतग्रस्त असल्याने, तो ठराविक वेळेत ठीक न झाल्यास संजूला संधी मिळू शकते. त्यानंतर आगामी वन डे विश्वचषकासाठी देखील त्याला भारतीय संघात जागा मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

(Aaksh Chopra Slams Selector For Not Picked Sanju Samson For Asia Cup)

महत्वाच्या बातम्या-  
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---