---Advertisement---

भज्जी पुन्हा घेणार ‘फिरकी’, करणार जोरदार ‘फटकेबाजी’; हरभजनच्या नव्या इनिंगला लवकरच सुरुवात?

On: गुरूवार, मार्च 17, 2022 12:33 PM
bhajji
---Advertisement---

क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे नवे नाही. गौतम गंभीर, नवजोत सिंग सिद्धू, मनोज तिवारी असे बरेच भारतीय क्रिकेटपटू राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. आता याच साखळीत अजून एक नाव जोडले जाऊ शकते. ते नाव आहे, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचे. हरभजन लवकरच राजकारणाच्या मैदानात (Harbhajan Singh In Politics) उतरू शकतो आम आदमी पार्टी (आप, AAP) त्याला पंजाबमधून राज्यसभेत (Harbhajan Singh To Join AAP) पाठवू शकते. ४१ वर्षीय हरभजनने डिसेंबर २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमध्ये सत्ता प्रस्थापित करणारे आपचे नवे सरकार हरभजनकडे क्रिडा विद्यापीठाची कमान सोपवली जाऊ शकते. पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतेच जालंधरमध्ये क्रिडा विद्यापीठ बनवण्याचे वचन दिले आहे. 

हरभजनने ट्वीट करत शुभेच्छाही दिल्या होत्या
पंजाबमध्ये आपच्या मोठ्या विजयानंतर ‘भज्जी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजनने ट्वीट करत भगवंत मान यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. त्याने लिहिले होते की, ‘आम आदमी पार्टी आणि आमचे नवे मुख्यमंत्री बनल्यामुळे मित्र भगवंत मान यांना शुभेच्छा. मला हे ऐकून आनंद झाला की, आमचे नवे मुख्यमंत्री शहिद भगत सिंग यांच्या खटकडकला गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.’

आपने पहिल्यांदाच पंजाबमध्ये मोठ्या बहुमताने विजय मिळवला आहे. आपने भगवंत मान यांच्या नेतृत्त्वात ११७ पैकी ९२ सीट जिंकत बाजी मारली आहे.

हरभजन सिंगची कारकीर्द
हरभजन सिंगने आपल्या कारकीर्दीत एकूण १०३ कसोटी क्रिकेट सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने एकूण ४१७ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याने २५ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तसेच ५ वेळा एका डावात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. याखेरीज फलंदाजी करताना कसोटीत त्याने २ शतकेही केली आहे. तसेच २३६ वनडे सामन्यांमध्ये त्याने २६९ विकेट्स घेतल्या होत्या. तर २८ टी२० सामन्यात त्याने २५ विकेट्सची कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

जो रुटने २५ वे कसोटी शतक करत विलियम्सनला टाकले मागे, आता विराट-स्मिथच्या विक्रमावर नजर

‘कब खून खोलेगा रे तेरा’, बाबर आझमने २ वर्षांनंतर शतक केल्याने विराट कोहली होतोय ट्रोल

साल २००७ च्या विश्वचषकात बांगलादेशने भारताला पराभूत करण्याच्या आदल्या दिवशी घडली होती ‘ही’ दुर्दैवी घटना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---