---Advertisement---

‘मी तुझ्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळून दाखवेल’, लाईव्ह शोमध्ये आमिर खानचे इरफानला चॅलेंज, पाहा पुढे काय झालं?

On: मंगळवार, मे 24, 2022 4:52 PM
Aamir-Irfan-Video
---Advertisement---

आयपीएल २०२२चा हंगाम आता हळूहळू शेवटाकडे चालला आहे. आयपीएलमधील साखळी फेरी सामने संपले असून २४ मे पासून प्लेऑफ्स सामन्यांना सुरुवात होणार आहे. गुजरात टायटन्स, लखनऊ सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस होईल. यादरम्यान आयपीएल २०२२मधील एका सामन्यापूर्वीच्या लाईव्ह शोमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची एन्ट्री झाली. त्याने या शोमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण याला आव्हानही दिले. 

आपण तुझ्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळू दाखवू असे आव्हान आमिरने (Aamir Khan Challenge To Irfan Pathan) इरफानला दिले. स्टार स्पोर्ट्सने या गमतीशीर प्रसंगाचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या लाईव्ह शोमध्ये आमिर खान (Aamir Khan) गेल्यानंतर तिथे उपस्थित भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि जतिन सप्रू यांनी आमिरने स्वागत केले. आमिरने शोमध्ये येताच आपली निराशा व्यक्त करत मजेत इरफानला (Irfan Pathan) म्हटले की, “इरफान मी तुझ्या विधानांवर खूप निराश आहे. तू म्हटलेस की मी क्रिकेट खेळण्यास पात्र नाही. पण तुला माहितीय का, भारताचा पहिला कर्णधार होता आणि पदार्पणात कोणी पहिले शतक ठोकलेय? भुवनने. मी लगान या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. मला फक्त एक संधी द्या.” 

पुढे बोलताना आमिरने इरफानला आव्हान दिले. तो म्हणाला की, “मी तुला आव्हान देतो की, मी तुझ्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळू शकतो. याशिवाय हरभजन सिंगलाही बोलवा. तोदेखील काल खूप बोलत होता.” 

यावर उत्तर देताना इरफान म्हणतो की, “आमिर भाई, मी तुझ्या अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. परंतु क्रिकेटच्या बाबतीत मला तितका विश्वास नाही.” 

मग आमिरने स्टूडिओमध्ये उपस्थित शास्त्रींची मदत मागितली. यावर शास्त्रींनी इरफानची पायखेची करत त्याला म्हटले की, “इरफान. फक्त आमिरच्या हाताच्या बाजूंच्या हालचाली पाहा. तो एक चांगला क्रिकेटपटू बनू शकतो. फक्त त्याला एक संधी देऊन पाहा.” यावर इरफान आमिरला संधी देण्यास होकार देतो.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भारीच ना! एबी डिविलियर्स पुन्हा दिसणार आरसीबी संघात, स्वत:च केलाय ‘मोठा’ खुलासा

‘अनेकांनी घरी पाठवण्याची तयारी केलेली, म्हणूनच…’ टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या कार्तिकची प्रतिक्रिया

सर्फराज खानच्या भावाची झाली मुंबईच्या रणजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---