मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या आमिर खानने मास्टर ब्लास्टर सचिनबद्दलच्या आठवनींना उजाळा दिला आहे. त्यात आमिर खान सचिनचा पुढील आठवड्यात येणार चित्रपट सचिन अ बिलियन ड्रीमलाही शुभेच्छा देतो.
आमिर म्हणतो, ” मी सचिनचा मोठा चाहता आहे. तो जेव्हा फलंदाजीला जायचा तेव्हा मी त्याला जोरदार पाठिंबा द्यायचो. कधीकधी तो गोलंदाजी करायचा तेव्हा मी त्याच्या आधी टीव्ही समोर अपील करायचो. ”
” लगान चित्रपटाच्या प्रीमियरला सचिन आला होता तेव्हा सचिन चित्रपट पहात होता तर मी सचिनचे हावभाव. जेव्हा इंग्लंडची पहिली विकेट खूप वेळाने चित्रपटात पडते तेव्हा सचिन जागेवर उठून आनंद साजरा करतो तो क्षण माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय आहे. ” असे आमिर पुढे म्हणतो.
https://youtu.be/M8BNDhbRdJs