कोरोना व्हायरस आता जगभरात पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतातही वेगाने वाढत आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. तसेच आता इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने कोरोना व्हायरसबद्दल शुक्रवारी (२० मार्च) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून संदेश दिला आहे.
यामध्ये पीटरसनने (Kevin Pietersen) भारतीय नागरिकांना कोरोना व्हायरसला थांबविण्यासाठी सरकारने (Government) जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची विनंती केली आहे. पीटरसनने केलेले हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
खरं तर, पीटरसनने हे ट्वीट हिंदीमध्ये केले आहे. त्याने हे ट्वीट हिंदीमध्ये लिहिण्यासाठी मदत करणाऱ्या खेळाडूच्या नावाचा या ट्वीटमध्ये समावेश केला आहे. ३९ वर्षीय पीटरसनने हे ट्वीट लिहिण्यासाठी ज्या खेळाडूची मदत घेतली, तो खेळाडू आयपीएलमध्ये त्याचा संघसहकारी होता. या क्रिकेटपटूचे नाव श्रीवत्स गोस्वामी (Shreevats Goswami) असे आहे.
पीटरसनने या ट्वीटची (Tweet) सुरुवात ‘नमस्ते’ने केली आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, “नमस्ते इंडिया, आपण सर्वजण कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी एकत्र प्रयत्न करत आहोत. आपण सर्वजण आपापल्या सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि आदेशाचे पालन करुया आणि काही दिवस घरांमध्येच राहुया. ही वेळ सावधगिरी बाळगण्याची आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.”
तसेच पीटरसनने ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “माझे हिंदी शिक्षक श्रीवत्स गोस्वामी.” या ट्वीटला प्रत्युत्तर देत गोस्वामीने लिहिले की, “तुम्ही चांगल्याप्रकारे शिकणारे आहात. पुढच्या वेळी तुम्ही हिंदीत बोलतानाचा व्हिडिओ बनवा.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, ट्विटरऐवजी दुसरं काहीतरी बघ
-जगातील श्रीमंत क्रिकेट लीगमधून डेविड वाॅर्नर बाहेर
-राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा