---Advertisement---

अरे बापरे! चालू सामन्यातच फिंचने दिली रसेलला शिवी, पाहा पुढे काय झालं

On: मंगळवार, ऑक्टोबर 13, 2020 7:04 PM
---Advertisement---

सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. मात्र सामन्यात अशी एक गोष्ट घडली, जी चाहत्यांच्या नजरेतून दडली नाही. सामन्यादरम्यान बेंगलोरचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचने कोलकाताच्या आंद्रे रसेलला शिवीगाळ केली. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे फिंच आणि देवदत्त पडिक्कल सलामीला फलंदाजासाठी मैदानावर उतरले. फिंचने ३७ चेंडूत ४७ धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान डावातील सहावे षटक टाकण्यासाठी रसेल आला. त्याने षटकातील चौथा चेंडू स्लो लेंथने टाकला. त्यावर फिंचला पुल शॉट मारायचा होता. पण चेंडूची गती कमी असल्यामुळे फिंचला तो चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही.

त्यानंतर त्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्याच्या तोंडून अपशब्द निघाले. पण रसेलने त्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र फिंचचा आवाज स्टम्प माइकमध्ये कैद झाला होता, जो नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

https://twitter.com/faceplatter49/status/1315666449650778115?s=20

फिंच आणि त्याच्यासोबत फलंदाजीला आलेला पडिक्कल बाद झाल्यानंतर, बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्सने शतकी भागीदारी केली. त्यामुळे बेंगलोरने १९४ धावांचा भलामोठा स्कोर उभारला. तसेच गोलंदाजीतही त्यांनी चांगले प्रदर्शन केले आणि कोलकाताचा डाव ११२ धावांवरच गुंडाळला.

महत्त्वाच्या बातम्या-

“थोडी वाट पाहा, या वर्षाअखेर तो टीम इंडियात दिसेल,” माजी क्रिकेटरचा दावा

जसप्रीत बुमराहमुळे विराटला सुर गवसला?, पाहा काय आहे कारण

राजस्थान संघाकडून झालं ‘ट’ चं ‘क’, मग काय थेट इंग्लंडच्या…

ट्रेंडिंग लेख-

IPL 2020: करोडो रुपयांमध्ये मुंबईच्या ताफ्यात सामील झालेले ‘हे’ ३ खेळाडू पूर्ण हंगामात बसणार बाहेर?

आयपीएल २०२०चा अर्धा हंगाम पूर्ण, मुंबई-दिल्ली संघ उपांत्य फेरीच्या वाटेवर

गोलंदाजी ऍक्शनमुळे कोलकाताचा सुनील नरेन अडकलाय संकटात, यापूर्वी ‘इतक्या’ वेळा झालंय असं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---