बंगळुरू। आज आयपीएल २०१८ मधील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात होत आहे. अॅराॅन फिंच आज किंग्ज ११ पंजाब संघाकडून खेळत आहे.
हा त्याचा आयपीएलमधील ७वा संघ आहे. त्याने २०१० पासून चक्क ७ वेगवेगळ्या संघाकडून भाग घेतला आहे.
२०१०मध्ये राजस्थानकडून १ सामना, २०११-१२ दिल्लीकडून ८ सामने, २०१३मध्ये पुण्याकडून १४ सामने, २०१४मध्ये हैद्राबादकडून १३ सामने, २०१५मध्ये मुंबईकडून ३ सामने, २०१६-१७मध्ये गुजरातकडून २६ सामने तर २०१८मध्ये पंजाबकडून तो आपला पहिला सामना आज खेळत आहे.
आयपीएलमध्ये पार्थिव पटेल, थिसारा परेरा आणि दिनेश कार्तिक हे ६ वेगवेगळ्या संघांकडून खेळले आहेत. तर विराट कोहली आजपर्यंत ११ मोसमात केवळ बेंगलोर संघाकडून खेळला आहे.
अॅराॅन फिंचने ६६ सामने खेळला असून त्यात त्याने २७.१७च्या सरासरीने १६०३ धावा केल्या आहेत.