राजकोट। ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने म्हटले आहे की ते मैदानाबाहेरही नेहमी एकत्रच असतात.
काल(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यानंतर स्मिथ आणि लॅब्यूशानेच्या मैत्रीबद्दल हर्षा भोगले यांनी फिंचला प्रश्न विचारला की ते दोघे खूप वर्षांनी भेटलेले भाऊ वाटत आहेत, नाही का?
या प्रश्नाचे उत्तर देताना फिंच हसून म्हणाला, ‘हो नक्कीच. त्यांना एकमेकांबरोबर फलंदाजी करायला आवडते. ते दिवसातील प्रत्येक मिनिट एकमेकांबरोबर असतात. मला वाटते ते केवळ झोपताना एकत्र नसतात.’
काल पार पडलेल्या सामन्यात भारताने दिलेल्या 341 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ(98) आणि मार्नस लॅब्यूशाने(46) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचली. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
असा सामना क्रिकेट सामना होईल कुणी विचारही केला नव्हता
वाचा👉https://t.co/D4bOtlWNlA👈#म #मराठी #Cricket #OnThisDay— Maha Sports (@Maha_Sports) January 18, 2020
तिसऱ्या वनडेआधी भारताला जबरदस्त मोठा धक्का, हे दोन खेळाडू झाले दुखापतग्रस्त
वाचा- 👉 https://t.co/SQWEfozktm👈#म #मराठी #Cricket #INDvsAUS #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 18, 2020