इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामासाठी १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. यात काही खेळाडू कोटी रुपयांचे मानकरी ठरले तर काही खेळाडूंना खाली हात परतावे लागले. अशातच २०२० च्या आयपीएल सत्रात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळलेल्या आरॉन फिंच या दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाजाला आयपीएल लिलावात कुठलाही खारिदीदार मिळाला नाही. याबद्दल फिंचने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
दुबईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंच याला ४.४ कोटी खर्च करत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. त्याने या स्पर्धेत खेळलेल्या १२ सामन्यात २२.३३ च्या सरासरीने अवघ्या २६८ धावा केल्या होत्या. त्याची खास कामगिरी झाली नसल्याने आरसीबी संघाने त्याला आयपीएल २०२१ च्या लिलावाआधी संघातून मुक्त केले होते. मात्र, या लिलावात त्याला कोणत्याच संघाने पसंती दिली नाही.
अनसोल्ड झाल्यानंतर आली फिंचची प्रतिक्रिया, म्हणाला….
“पुन्हा खेळण्याची संधी मिळाली असती तर बरं झालं असतं. ही एक अदभुत स्पर्धा आहे, परंतु मला माहित होते की माझी निवड नाही होणार आहे. मला क्रिकेट खेळायला आवडेल, परंतु काही काही काळ घरी वेळ घालवणे देखील वाईट नसेल. आम्ही ऑगस्ट महिन्यात यूकेसाठी रवाना झालो होतो, त्यांनतर आमचे वेळापत्रक खूप थकावणारे होते. यात खूप वेळ बायोबबलमध्येच गेला. यामुळेच घरी जाऊन आराम करणे चांगले असेल. माझी पत्नी या गोष्टीची वाट पाहत असेल.”
आरॉन फिंच याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील कामगिरी
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २८७ धावा केल्या आहेत. तसेच १३२ एक दिवसीय सामन्यात ४१.९ च्या सरासरीने ५२३२ धावा केल्या आहेत. यात १७ शतक आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे.तसेच ६६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २१५९ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतक आणि १२ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रसेल, पूरनसह ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू गेलच्या ड्रीम टीममध्ये, सांगितले समावेशाचे कारण
रोहितचे टीकारांना सडेतोड उत्तर ‘प्रत्येक संघ मायदेशात आपल्या मजबुतीसह खेळत असतो, आम्हीही जेव्हा…’
भारतीय संघात निवड झाल्यानंतर सुर्यकुमारची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ही भावना…’