कोरोनाच्या वाढत्या प्रधुभावमुळे बरेच दिवस बायोबबलमध्ये राहावे लागत असल्या कारणाने अनेक आंतराष्ट्रीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मालिका आणि टी२० लीगमधून माघार घेतली आहे. असेच काही ऑस्ट्रेलिया संघाच्या बाबतीतही बघायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया संघातील काही स्टार खेळाडूंनी वेस्टइंडीज आणि बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचनने मोठे विधान केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांचा कर्णधार फिंचनी शुक्रवारी (२५ जून) म्हटले आहे की टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या निवडीदरम्यान वेस्ट इंडीज आणि बांगलादेशच्या आगामी दौर्यामधून बाहेर पडलेल्या खेळाडूंकडे खऱ्या अर्थाने दुर्लक्षित केले जाऊ शकते.
इंडियन प्रीमियर लीगमधील ऑस्ट्रेलियाचे सात खेळाडू डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टॉयनिस आणि डॅनियल सॅम यांनी वेस्ट इंडीज आणि बांगलादेशाच्या आगामी दौर्यातून विविध कारणांमुळे माघार घेण्याची घोषणा केली आहे. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मात्र, कोपराच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे.
फिंच म्हणाला आगामी दौऱ्यातून माघार घेणाऱ्या खेळाडूना पुढे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळण्याबाबत धोका आहे, कारण यासाठी अनेक खेळाडू आपली दावेदारी दाखवू शकतील.
फिंच म्हणाला, “हो, खरोखर एक वास्तविक शक्यता आहे. आपल्याला सध्याची खेळाडूंची लय पाहावी लागते आणि आपण अशा खेळाडूंची निवड करणार जे चांगले खेळत आहेत. या दौर्यावर येणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान मिळवण्याची संधी असेल.”
त्याने क्रिकेट एयू डॉट कॉमशी बोलताना सांगितले की, “चांगल्या आंतरराष्ट्रीय कामगिरीकडे दुर्लक्ष करणे खरोखर कठीण आहे. तर हो, अर्थातच काही खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारण्याची आणि संघात आपले स्थान पक्क करण्याची संधी असेल.”
ऑस्ट्रेलियाचा संघ सोमवारी(२८ जून) वेस्ट इंडिज दौर्यावर रवाना होईल. ऑस्ट्रेलिया संघात या दौऱ्यासाठी अनेक खेळाडूना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
किवी खेळाडूचा संघाला घरचा आहेर; म्हणे, ‘१३९ धावा करायला इतका वेळ लागेल वाटले नव्हते’
गोलंदाजीत हातखंडा असलेल्या चाहरने केला फलंदाजीचा सराव; म्हणाला, ‘शाळेचे दिवस आठवले’
भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक लढतीनंतर टीम पेनने चाहत्यांनी मागितली क्षमा, पाहा काय आहे प्रकरण






