काल(19 डिसेंबर) कोलकाता येथे आयपीएल 2020 साठी लिलाव झाला. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने काही मोठे खेळाडू खरेदी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांनी ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचला विकत घेतले आहे.
बेंगलोर हा फिंचचा आयपीएलमधील 8 वा संघ असणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये 8 संघांचे प्रतिनिधित्व करणारा तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे.
त्यामुळे सध्या त्याचा एक जूना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या कसोटी मालिकेतील आहे.
ज्यामध्ये एका सामन्यादरम्यान रोहित शर्मा फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक टिम पेन फिंचशी बोलताना म्हणाला आहे की, ‘तु आयपीएलमध्ये बर्याच संघांसाठी खेळला आहे ना’. त्यावर फिंचने उत्तर दिले की ‘बेंगलोर वगळता जवळ जवळ सर्वच संघाकडून.’
यावर पेन म्हणाला की ‘तू त्या संघाकडून का खेळला नाहीस, विराट कोहलीला तू आवडत नाही का?’. ज्यावर फिंच म्हणाला की, ‘मी कुणालाही आवडत नाही, यामुळे मी एका संघाकडून दुसऱ्या संघाकडे जात असतो.’
Aussie star Aaron Finch is off to @RCBTweets in the #IPLAuction2020. Let's hope his new teammates like him 😂😂😂 pic.twitter.com/VGfUFfJffq
— cricket.com.au (@cricketcomau) December 19, 2019
फिंच बेंगलोर संघात आल्याने आता विराट कोहली आणि तो एकाच संघाकडून खेळताना दिसतील.
त्यामुळे आयपीएल लिलिवादरम्यान हा जूना व्हिडिओ cricket.com.aus च्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘ ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ऍरॉन फिंच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात आहे. आता आशा आहे की नवीन संघसहकाऱ्यांना तो आवडेल.’
बेंंगलोरने लिलिवादरम्यान फिंचसह अष्टपैलू ख्रिस मॉरिस, केन रिचर्डसन, डेल स्टेन अशा स्टार परदेशी खेळाडूंनाही खरेदी केले आहे.
हे ४ मुंबईकर खेळाडू आयपीएल २०२०मध्ये खेळणार दिल्ली कॅपिटल्सकडून!
वाचा👉https://t.co/yAJbo8dM1t👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
ज्युनियर द्रविडचा फलंदाजीत राडा, केला सिनीअर द्रविडसारखाच कारनामा
वाचा👉https://t.co/gEemwhXIE6👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #Cricket #SamitDravid— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019