सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. मायदेशात सुरू असेलेल्या या टी२० मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने आफ्रिकी संघाने तरे एक सामना भारताने जिंकला. उभय संघातील चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. त्यात भारताचा कर्णधार रिषभ पंतला फलंदाजीत काही नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे ते लक्षात घेता आशिष नेहराने त्याला एक महत्वाचा सल्ला दिलेला आहे.
एका मुलाखतीत आशिष नेहरा म्हणाला,”यंदाच्या आयपीएलकडे पाहता रिषभ पंत या मोसमातील कामगिरीवर खूप नाराज असेल. रिषभचे वय २४ च्या आसपास आहे, पण तो आता पाच वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे या छोट्या फॉरमॅटमध्ये तो आता अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या पुनरागमनामुळे पंतला कदाचितच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते.”
पुढे बोलताना नेहरा म्हणाला की, “अशा परिस्थितीत त्याने आपली सध्याची फलंदाजीची स्थिती लक्षात न ठेवता आपला नैसर्गिक खेळ खेळला पाहिजे. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाची भूमिका बजावत आहे आणि साहजिकच खूप स्पर्धा असल्यामुळे त्याच्यावर नेहमीच दबाव असेल. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीही भविष्यात पुनरागमन करतील. या मालिकेत रिषभ पंतने त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करावे असे मला वाटते.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधाराची भूमिका बजावत असलेल्या युवा रिषभ पंतसाठी ही टी२० मालिका फलंदाजीच्या बाबतीत आतापर्यंत अगदी सामान्य ठरली आहे. तीन सामन्यांमध्ये पंतने बॅटने केवळ ४० धावा केल्या आहेत आणि मागील दोन सामन्यांमध्ये तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. दुसरीकडे, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा मानतो की पंत कामगिरीसाठी स्वत:वर खूप दबाव टाकत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘रिषभच्या जागी ‘या’ खेळाडूला २०१९ मध्ये संधी द्यायला हवी होती’ पंतवर भडकला गौतम गंभीर
पुन्हा दक्षिण आफ्रिकेचचं नाणं खणकलं, धाकड फलंदाजाचेही पुनरागमन; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग Xi