दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि मिस्टर ३६० नावाने प्रसिद्ध असलेला एबी डिविलियर्स तिसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे. डिविलियर्सने तो तिसऱ्यांदा बाबा झाल्याची आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.
डिविलियर्स आणि त्याची पत्नी डॅनियल डिविलियर्सने आपल्या मुलीसोबत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. डिविलियर्सच्या मुलीचा जन्म ११ नोव्हेंबर २०२० ला झाला आहे.
डिविलियर्स आणि डॅनियलने आपल्या मुलीसोबत शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देत लिहिले की, “११ नोव्हेंबर २०२० ला आम्ही आमच्या गोड मुलीचं या जगात स्वागत केले.” डिविलियर्सने आपल्या मुलीचे नावही येंते डिविलियर्स ठेवले आहे.
https://www.instagram.com/p/CHyFTA2gRWz/?utm_source=ig_web_copy_link
एबी डिविलियर्स आणि डॅनियलला यापूर्वी दोन्हीही मुलेच आहेत. अब्राहम डिविलियर्स ज्यूनियर आणि जॉन रिचर्ड डिविलियर्स असे त्यांचे नाव आहे. अब्राहमचा जन्म २०१५ मध्ये झाला होता, तर जॉन रिचर्डचा जन्म २०१७ मध्ये झाला होता.
एबी डिविलियर्स आणि डॅनियलची लव्ह स्टोरी खूपच शानदार आहे. डिविलियर्सने डॅनियलला भारतातील ताजमहलसमोर प्रपोज केले होते. त्यांचे लग्न ३० मार्च २०१३ मध्ये झाले होते.
डिविलियर्सला भारताबद्दल खूप आदर आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळतो. त्याने आयपीएल २०२०मध्ये बेंगलोर संघाकडून खेळताना १५ सामन्यात ४५.४० च्या सरासरीने ४५४ धावा कुटल्या होत्या. या धावा करताना त्याने ५ अर्धशतकेही ठोकली आहेत.
डिविलियर्सने आपल्या पुस्तकात ‘एबी- द ऑटोबायोग्राफी’ मध्ये आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले आहे. त्यात त्याने सांगितले आहे की, कशाप्रकारे त्याने आयपीएल २०१३ च्या सुरुवात होण्यापूर्वी डॅनियलला ताजमहल दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. तिथेच त्याने तिला गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
एबी डिविलियर्सने केले मुंबई इंडियन्सचे खास कौतुक, वाचा काय म्हणाला…
‘एबी डिविलियर्स सोबतची ‘ती’ आठवण आयुष्यभर जपून ठेवेन,’ चहलच्या होणाऱ्या पत्नीची भन्नाट पोस्ट
भारताकडे बुमराह आणि शमी असेल, तर आमच्याकडे कमिन्स, स्टार्क आहेत, पाहा कोण म्हणतंय