आज आयसीसीने खेळाडूंची वनडे क्रमवारी जाहीर केली. यात दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने विराटला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.
एबी डिव्हिलिअर्सचे बांगलादेशविरुद्ध तुफानी कामगिरी केल्यामुळे ८७९ गुणांसह तो अव्वल स्थानी आला आहे. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या कर्णधाराचे ८७७ गुण आहेत.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा ७९० गुणांसह ७व्या स्थानी आहे तर एमएस धोनी ७३८ गुणांसह १२व्या स्थानी आहे.
गोलंदाजीमध्ये ६७१ गुणांसह जसप्रीत बुमराह ६व्या स्थानावर तर ६६३ गुणांसह अक्षर पटेल ८व्या स्थानावर आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत कोणताही खेळाडू पहिल्या १० मध्ये नसून २२९ गुणांसह हार्दिक पंड्या १५व्या स्थानी आहे.