---Advertisement---

…आणि ‘त्याने’ ३५ व्या अर्धशतकासाठी केवळ २ धावा कमी असताना जडला षटकार, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 5:59 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये सोमवारी (28 सप्टेंबर) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात बेंगलोरने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. बेंगलोरने हा सामना जिंकत स्पर्धेतील दुसरा विजय आपल्या नावावर केला आहे.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बेंगलोर संघाने ३ विकेट्स गमावत २०१ धावा ठोकल्या होत्या. यादरम्यान विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने ठोकलेल्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा षटकार डिविलियर्स २२ चेंडूत ४८ धावांवर खेळत असतानाचा आहे. त्याला आपले ३५ वे अर्धशतक ठोकण्यासाठी केवळ २ धावा हव्या होत्या.

त्याचवेळी डिविलियर्सने १ किंवा २ धावा न घेता थेट दमदार षटकार ठोकला. आणि आपले ३५ वे अर्धशतक झळकावले. त्याने ठोकलेल्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या सामन्यात डिविलियर्सने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकत ५५ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने बेंगलोरच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.

https://twitter.com/RezaAhm91905564/status/1310607670601154564

डिविलियर्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.४९ च्या सरासरीने ४५३५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि ३५ अर्धशतके ठोकली आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---