येत्या 19 डिसेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी खेळाडूंचा मिनी लिलाव आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व संघ आमण रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतणार, अशा चर्चा सथ्या सर्वत्र सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी दिग्गज एबी डिविलियर्स याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघाचा महत्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबई इंडियन्ससोबत खेळताना आयपीएल किताब जिंकले होते. पण खराब फॉर्म आणि सतत होत असलेल्या दुखापतींमुळे मुंबई फ्रँचायझीने आयपीएल 2022 (IPL) आधी रिलीज केले होते. लिलावात देखील संघ त्याला खरेदी करू शकला नाही. परिणामी गुजरात टायटन्स संघात सामील झालेल्या हार्दिकला कर्णधारपद मिळाले. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात गुजरात संघाला कर्णधार हार्दिकने विजेतेपद मिळवून दिले. मागच्या हंगामात देखील त्याच्याच नेतृत्वात गुजरात संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता.
अशात आगामी हंगामात हार्दिकने मुंबईचा हात पुन्हा हातात घेतला, तर गुजरात टायटन्ससाठी नक्कीच हा धक्का असू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स यानेही हार्दिकबाबत प्रतिक्रिया दिली. डिविलियर्सच्या मते हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनू शकतो. डिविलियर्स म्हणाला, “रोहित मुंबईचा कर्णधार आहे आणि त्याला नेतृत्व करायला आवडते. अशात हा निर्णय रोमांचक आहे. हार्दिकनेही अनेक वर्ष मुंबईसाठी खेळले आहे आणि एक मोठा खेळाडू आहे. वानखेडे स्टेडियमवर त्यालाही खेळायला आवडते. गुजरात टायटन्ससाठी त्याने ट्रॉफी जिंकली आहे आणि नंतर (2023) अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे.”
डिविलियर्स पुढे असेही म्हटला की, “हार्दिकला असे वाटत असावे की, गुजरातसोबत त्याचा वेळ पूर्ण झाला आहे. आता पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. मला हे थोडे विचित्र वाटते, पण रोहित त्याला (हार्दिक) नेतृत्व करण्याची संधी देऊ शकतो. संघाची जबाबदारी हार्दिकच्या हातात येऊ शकते. कारण रोहितवर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. कर्णधारपदाच्या दबावामुळे शक्यतो हा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण नक्की काय होते, हे पाहावे लागेल.”
हार्दिकने आतापर्यंत पाच आयपीएल ट्रॉफी उंचावल्या आहेत. पण डिविलियर्स मात्र, कारकिर्दीत एकही आयपीएल किंवा आयसीसी ट्रॉफी उंचावू शकला नाही. (AB de Villiers reacts to Hardik Pandya’s return to Mumbai Indians)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । ‘तर मुंबईच्या हाती…’, हार्दिक पंड्याच्या बातम्या वाचून अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया
क्रिकेट नव्हेतर ‘या’ गोष्टींमध्ये आहे धोनीला इंटरेस्ट, रायुडूने केला खुलासा