AB De Villiers And Virat Kohli Fight: यंदाचा आयपीएल हंगामातील फायनल सामना (3 जून) रोजी खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पंजाबला धूळ चारत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. (RCB Win IPL Trophy) या विजयासोबतच चाहत्यांनी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सची मैत्री देखील पाहिली. या दोघांची मैत्री तेव्हापासूनच खूप लोकप्रिय आहे, जेव्हा ते दोघे आरसीबीसाठी एकत्र खेळत होते. परंतु, या 2 खेळाडूंच्या मैत्रीत दुरावा आल्याची बाब समोर आली आहे आणि याचा खुलासा स्वतः एबी डिव्हिलियर्सने केला आहे.
क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी झालेल्या त्याच्या एका मोठ्या चुकीबद्दल खुलासा केला. डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी विराट-अनुष्काच्या पालकत्वाबद्दल (parenting) सोशल मीडियावर (social media) खुलासा केला होता. त्यानंतर विराट आणि डिव्हिलियर्स यांच्यात मतभेद सुरू होता. डिव्हिलियर्सने सांगितले की, कोहलीने अनेक महिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. (Virat Kohli ignored ABD)
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स आरसीबीचा विजय एकत्र साजरा करताना दिसले. डिव्हिलियर्सने सांगितले की, विराटशी मतभेद झाल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांची पुन्हा एकदा बोलणी सुरू झाली. डिव्हिलियर्स म्हणाला की, “माझे आणि विराटचे पुन्हा एकदा बोलणे सुरू झाल्याबद्दल मी आनंदी आहे.” (AB de Villiers revelation)
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न 2017 साली झाले होते. हे दोघे खूप काळापासून एकमेकांना डेट करत होते. 2021 साली या दोघांना एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी वामिका (Vamika) ठेवले. तर 2024 मध्ये अनुष्का-विराटला एक मुलगा झाला, ज्याचे नाव अकाय (Akaay) ठेवण्यात आले. विराट आणि अनुष्का दोघेही आपल्या गोष्टी खाजगी ठेवू इच्छितात, त्यामुळे त्यांनी अद्याप आपल्या मुलांचे फोटोही (photos) सार्वजनिक (reveal) केलेले नाहीत.






