---Advertisement---

‘विराटसेने’च्या ऐतिहासिक विजयानंतर एबीचे भन्नाट ट्वीट, टीकाकारांची बसली असेल ‘दातखिळी’!

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 1:51 PM
---Advertisement---

सोमवार रोजी (०६ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये चौथा कसोटी सामना पार पडला. द केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे पार पडलेला हा सामना भारतीय संघाने १५७ धावांनी खिशात घातला. या विजयासह त्यांनी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात अवघ्या १९१ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघासाठी हा विजय अशक्य दिसत होता. परंतु विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने सांघिक प्रदर्शन करत सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. या ऐतिहासिक विजयानंतर विराटचा जवळचा मित्र एबी डिविलियर्स याने जबरदस्त शब्दांत त्याचे कौतुक केले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डिविलियर्स हा आयपीएलमधील कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. त्याने ओव्हलवर तब्बल ५० वर्षांनंतर भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाचे कौतुक केले आहे. यावेळी त्याने २ ट्वीट केले आहेत. यातील पहिले ट्वीट त्याने भारतीय संघाच्या निवड प्रकियेवर केले असून टीकाकारांवर निशाणा साधला आहे.

त्याने लिहिले आहे की, ‘कसोटी क्रिकेटचा एक दर्शक असण्याच्या नाते तुम्ही संघ निवड किंवा इतर व्यर्थ गोष्टींची चिंता करणे थांबवा. याउलट तुम्ही उभय संघातील स्पर्धा, कौशल्य, स्वदेशाभिमानासाठी खेळाडूंची झुंज यांचे कौतुक करायला सुरु करा. तुम्हाला फक्त तुमच्या संघाला उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायचे आहे.’

दुसऱ्या ट्वीटमध्ये डिविलियर्सने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. ‘भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ दाखवला. कोहलीने कर्णधाराच्या रुपात आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. इंग्लंडचे खेळाडूही चांगले खेळले. यानंतर मी कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी खूप उत्साहित आहे,’ असे त्याने दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले.

https://twitter.com/ABdeVilliers17/status/1434913887770472452?s=20

दरम्यान पहिल्या डावात केवळ १९१ धावांपर्यंत मजल मारु शकलेला भारतीय संघ दुसऱ्या डावात मजबूत स्थितीत आला. सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि शार्दुल ठाकूर, रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक यांमुळे भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडकडून फक्त सलामीवीर रॉरी बर्न्स (५० धावा) आणि हसीब हमीद (६३ धावा) मोठ्या धावा करु शकले आणि इंग्लंडचा संघ २१० धावांवर गारद झाला.

भारताकडून शेवटच्या डावात उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

एक नंबर विकेट! मयंकचा ‘रॉकेट थ्रो’ अन् रिषभची चपळता, इंग्लंडचा मोठा फलंदाज दुर्देवीरित्या धावबाद

प्रबळ आत्मविश्वास… ‘त्याने’ स्वत:हून गोलंदाजी मागितली अन् मोठ्या विकेट्सही घेतल्या, कोहलीचा उलगडा

शार्दुलच्या अष्टपैलू कामगिरीचा धुरळा! गेल्या ५२ वर्षांत ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा दुसराच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---