इंडियन प्रीमियर लीगचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यंदा वेगळ्याच अंदाजात असल्याचे दिसत आहे. आयपीएल २०२१ चा दणदणीत विजयासह श्रीगणेशा केल्यानंतर आपली विजय घोडदौड कायम राखण्यात त्यांना यश आले आहे. रविवार रोजी (१८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) झालेल्या हंगामातील दहाव्या सामन्यात त्यांनी ३८ धावांनी बाजी मारत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. त्यांचा धाकड यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
दरम्यान केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसेलच्या एका षटकात त्याने खोऱ्याने धावा काढल्या. हे पाहून सामना पाहण्यासाठी आलेली त्याची पत्नी व मुलगी भलतीच खुश झाल्याचे पाहायला मिळाले.
तर झाले असे की, जरी बंद दाराआड आयपीएल २०२१ चे सामने खेळवले जात असले, तरीही सहभागी खेळाडूंच्या कुटुंबियांना आणि मॅच ऑफिशियल्सना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे डिविलियर्सची पत्नी डॅनियल तिच्या मुलीसह आरसीबीला चियर करण्यासाठी आली होती.
यावेळी ‘मिस्टर ३६० डिग्री’नेही त्याच्या पत्नीला नाराज केले नाही. आरसीबीच्या डावातील शेवटच्या विसाव्या षटकात त्याने केकेआरचा गोलंदाज रसेलला चोप चोपले. ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने या षटकात २१ धावा कुटल्या. दरम्यान रसेलने षटकातील दुसरा चेंडू फुल टॉस टाकला आणि डिविलियर्सने त्यावर खणखणीत षटकार मारला.
https://twitter.com/lodulalit001/status/1383761444739588100?s=20
हे पाहून त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर कळी खुळली. डॅनियलसह त्यांची लहान मुलगीही डिविलियर्सच्या फटकेबाजीला एकटक पाहात होती. या माय-लेकीच्या चेहऱ्यावरील हावभावांनी सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात डिविलियर्सने ३४ चेंडूत ७६ धावांची ताबडतोब खेळी केली होती. दरम्यान त्याने ३ षटकार आणि ९ चौकार मारले होते. त्याच्या या प्रशंसनीय खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांना पुन्हा-पुन्हा विनंती करुनही नाही ऐकली ‘ही’ गोष्ट, कर्णधार केएल राहुलचा मोठा खुलासा
मॅक्सवेलचं अर्धशतक अन् विराटकडून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
शेतकऱ्याचा मुलगा, ज्याने पदार्पणात केला अर्धशतकवीर अगरवालचा अडथळा दूर; वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी