---Advertisement---

काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार

On: मंगळवार, ऑक्टोबर 27, 2020 6:15 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगच्या १०व्या हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे तो डिसेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या बीग बॅश लीग २०२०-२१ चा भाग नसेल. डिविलियर्स लवकरच वडील बनणार आहे. अशावेळी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे बीग बॅश लीगच्या ब्रिसबेन हिट संघांचा भाग असलेल्या डिविलियर्सच्या जागी संघाने अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब-उर-रेहमानला स्थान दिले आहे.

याविषयी बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “आम्हाला लवकरच तिसरे बाळ होणार असल्यामुळे मी आणि माझी पत्नी डॅनियल खूप आनंदी आहोत. त्यामुळे आमचे कुटुंब आणि कोविड-१९ ची परिस्थिती पाहता मी बीग बॅश लीगच्या या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

डिविलियर्सच्या या निर्णयामुळे ब्रिसबेन हिट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी म्हटले की, “आम्ही मागील हंगामानंतर डिविलियर्सच्या संपर्कात होतो. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित वाटत होते. परंतु पुढे अशा काही गोष्टी घडल्या की, सर्व योजनांमध्ये बदल करावा लागला. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीपेक्षा जास्त डिविलियर्सला त्याच्या तिसऱ्या बाळाची चिंता आहे.”

“आम्ही नेहमीच आमच्या ब्रिसबेन हीट कुटुंबाची काळजी घेतली आहे. त्यामुळे डिविलियर्सच्या या निर्णयाचेही आम्ही पूर्णपणे समर्थन करत आहोत. आम्ही यापुढेही त्याच्या संपर्कात राहू,” असेही लेहमन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोघांवर झाला अन्याय तर ‘या’ दोन शिलेदारांना लागली लॉटरी

IPL 2020: आज दिल्लीची कसोटी, हैदराबादला चितपट करत ठरणार प्लेऑफमध्ये स्थान मिळणारा पहिला संघ

भल्याभल्या क्रिकेटरला घाम फोडणारा गोलंदाज संपुर्ण कारकिर्दीत होता डिप्रेशनमध्ये

ट्रेंडिंग लख-

वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!

अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…

कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---