दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. डिव्हिलियर्स हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. आता एबी डिव्हिलियर्सने कबूल केले आहे की तो पुढील वर्षी पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिसणार आहोत. मात्र, यावेळी भूमिका बदललेली असेल.
डिव्हिलियर्सने नुकतेच एका ट्विटर स्पेसवर चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचा विचार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला,
“मी पुढील वर्षी नक्कीच चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे. मी खेळणार नाही मात्र दहा वर्षे ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, प्रेम दिले त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी तिथे येत आहे.”
डिव्हिलियर्सने या स्पेसवर असे देखील म्हटले की, मी माझा यूट्यूब चॅनल सुरू केला तर त्यावर गप्पा मारण्यासाठी येणारा पहिला पाहुणा विराट कोहली असेल. तर या चॅनलचे नाव एलियन डीव्हिलियर्स असे असेल, असे तो म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेचे 15 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रतिनिधित्व केलेला एबी डिव्हिलियर्स भारतातही तितकाच लोकप्रिय आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली कॅपिटल्ससह केली होती. मात्र, 2011 ते 2021 अशी दहा वर्ष तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळला. विराट कोहलीसह त्याची मैत्री सर्वश्रुत आहे. तो भारताला आपले दुसरे घर म्हणतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमध्ये देखील त्याने अनेक विक्रम रचले आहेत. भारतात सर्वात जास्त पण फॉलोईंग असलेल्या विदेशी क्रिकेटपटूंमध्ये त्याचा क्रमांक वरचा लागतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘ते 17 वर्षांनंतर आले तर त्यांना रिकाम्या…’ पाकिस्तान हरल्यावर हे काय बोलून गेले पीसीबी अध्यक्ष
T20WC: बुमराहबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे भाष्य! म्हणाला, ‘भारताला जिंकण्यासाठी त्याचे संघात…’