आयपीएल 2023चा मिनी लिलाव शनिवारी (दि. 23 डिसेंबर) कोचिन येथे पार पडला. या लिलावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्यावर मोठी बोली लागली. बऱ्याच संघानी त्याला आपल्या संघात सामील करुन घेण्यात रस दाखवला. मात्र, शेवटी तो 16.25 कोटीच्या रकमेवर चेन्नई सुपर किंग्ज संघात दाखल झाला. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज संघाला तो खूप स्वस्त किमतीत मिळाला, असे मत रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने व्यक्त केले.
माध्यमांशी बोलताना एबी डिव्हिलियर्स (Ab Devilliers) म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्ज नशीबवान संघ आहे. माझ्या मते बेन स्टोक्स याच्यासारख्या खेळाडूची कोणतीही किंमत नाही. तो एक अविश्वसणीय खेळाडू आहे. एक लीडर आहे. त्याच्याकडे गोलंदाजी आणि फलंदाजीचा देखील अनुभव आहे. तो सामना जिंकून देणारा खेळाडू आहे आणि त्याने सामने जिंकून द्यावेत हे तुम्हालाही वाटते. मला वाटतेे की त्याला त्याच्या गुणवत्तेपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे. तो अंडरपेड आहे.”
या लिलावात बेन स्टोक्स (Ben StokesAB devilliers on Ben Stokes) याने आपली बेस प्राईज 1 कोटी रुपये इतकी ठेवली होती. या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला खरेदी करण्यात सर्वात आधी रस दाखवला. नंतर लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेेंजर बंगलोर आणि सनरायझर्स हैैदराबाद या संघानीही त्याला संघात सामील करुन घेण्यासाठी बोली लावायला सुरुवात केली. जेव्हा बोली 15 कोटींपर्यंत पोहोचली, तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने यात उडी मारली आणि एमएस धोनी याच्या नेतृत्वातील या संघाने 16.25 कोटी रुपये मोजत त्याला आपल्या संघात सामील करुन घेतले. बेन स्टोक्सला आयपीएलमधून मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
जेव्हा स्टोक्सची सीएसकेच्या संघात वर्णी लागली तेव्हा, धोनीनंतर सीएसके संघाचे नेतृत्व स्टोक्सच्या हाती येऊ शकतेे अशा चर्चांना उधाण आले. अशातच सीएसके संघाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांचे विधान समोर आले आहे. माध्यम संस्थांशी बोलताना सीएसके संघाचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले की, “स्टोक्सला मिळवल्यानंतर आम्ही खूप उत्साहित होतो आणि नशीबवानही होतो कारण, तो शेवटी आम्हाला मिळाला. आम्हाला एक अष्टपैलू खेळाडू पाहिजे होता आणि एमएस धोनी खूप आनंदी होता की बेन स्टोक्स आम्हाला मिळाला.” त्याच बरोबर ते हेही म्हणालेे की स्टोक्सला कर्णधार बनवण्याचा निर्णय धोनी वेळेनुसार घेईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू, पण चर्चा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचीच; लव्हलाईफबद्दल वाचाच
लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरलेल्या हैद्राबादने ‘या’ तिघांवरच उधळले 26 कोटी, पाहा संपूर्ण संघ